बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! आरोग्य विभागाची परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलली; विद्यार्थी संभ्रमात

मुंबई | राज्यातील पदभरतीत चालू असणारा गोंधळ काही केल्या कमी होत नाही. तोंडावर आलेली आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की सरकारवर आली आहे. आरोग्य विभागाच्या परीक्षेला राज्यभरातून मोठ्या संख्येनं विद्यार्थ्यांनी आपले अर्ज भरले आहेत. परिणामी परीक्षा पुढे ढकलण्यानं सर्व विद्यार्थी आता गोंधळात पडले आहेत.

राज्यातील आरोेग्य विभागातील रिक्तपदांकरिता मोठा गाजा-वाजा करत ठाकरे सरकारनं भरती जाहीर केली होती. पण ही परीक्षा घेणाऱ्या कंपनीच्या चुकीच्या कारभारावरून आधीच विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम होता. परीक्षा 26 तारखेला असल्यानं राज्यातील काही विद्यार्थी परीक्षा केंद्रावर जाऊन पोहचले आहेत.

परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश पत्रातील चुकीच्या परीक्षा केंद्रावरून आधीच सरकार अडचणीत आलं असताना आता परीक्षा रद्द करण्यात आली आहे. परीक्षा रद्द झाल्यानं राज्यभरातील विद्यार्थी सरकारवर जोरदार टीका करताना दिसत आहेत.

सरकारनं परीक्षा रद्द करताना तांत्रिक कारणानं रद्द करत असल्यांच म्हंटलं आहे. गेली 2 वर्ष झालं राज्यात परीक्षा झाल्या नाहीत. राज्य सरकारनं आता तरी विद्यार्थ्यांच्या भविष्याचा काळजीपूर्वक विचार करावा अशी राज्यातील विद्यार्थी सरकारला विनंती करत आहेत.

थोडक्यात बातम्या

नरेंद्र मोदींनी घेतली जो बायडन यांनी भेट; दोन दिग्गज नेत्यांमध्ये बैठक सुरू

कोरोना अपडेट! मुंबईच्या आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात घट, वाचा आजची आकडेवारी

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

विराट कोहलीचा गगनचुंबी षटकार! शार्दूलचा चेंडू थेट स्टेडियमबाहेरील रस्त्यावर; पाहा व्हिडीओ

“माझी हात जोडून विंनती आहे की, किरीट सोमय्यांना अडवू नका”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More