बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सोन्याच्या दरात मागील चार महिन्यातील सर्वात मोठी घसरण; वाचा आजचे ताजे दर

नवी दिल्ली | भारतामध्ये सोन्या चांदीच्या दागिण्यांना मोठी मागणी आहे. एक उत्तम गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिलं जातं. भारतात सोन्याच्या वाढत्या मागणीमुळे सोन्याचा भाव नेहमीच गरम असतो. अशातच आता आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या दरात मोठी घसरण अनुभवायला मिळाली आहे.

आज एमसीएक्सवर सोन्याच्या दरात 1.3 टक्क्यांची घसरण अनुभवायला मिळाली आहे. गेल्या सहा महिन्यातील ही सर्वात मोठी घसरण आहे. सध्या एमसीएक्सवर 600 रुपयांच्या घसरणीसह सोनं 46 हजार 29 रुपये प्रती तोळ्यावर ट्रेंड करत आहे.

तसेच एमसीएक्सवर चांदीची किंमत देखील 1.6 टक्क्यांनी घसरली आहे. सध्या एमसीएस्कवर चांदी 1400 रुपयांच्या घसरणीसह 63,983 रुपये प्रती किलोवर ट्रेंड करत आहे. आंतराष्ट्रीय बाजारात देखील आज सोन्याच्या दरात 4.4 टक्क्यांचीघ घसरण झाली आहे.

दरम्यान, सोन्याच्या भावावर आंतराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही सोन्याच्या दरावर प्रभाव टाकत असल्याचं दिसून येतं. बहुतांशवेळा इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडून मुंबईतील सोन्याचा दर ठरवला जातो. या सोन्याच्या दरात स्थानिक आयात कर आणि MCX या कमोडिटी मार्केटचा विचार केला जातो. MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट असून या ठिकाणी सोन्याचा भाव ठरवला जातो.

थोडक्यात बातम्या –

देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात घट कायम; वाचा आजची आकडेवारी

शिल्पा शेट्टीच्या अडचणीत वाढ; आता आणखी एका आरोपामुळे चर्चेत

दिल्लीत खलबतं सुरुच; देवेंद्र फडणवीस पुन्हा अमित शहांच्या भेटीला

आरोग्य विभागात नोकरीची सुवर्णसंधी; ‘इतक्या’ हजार पदांसाठी भरती, वाचा सविस्तर

मुख्यमंत्र्यांनी बोलवली टास्क फोर्सची बैठक; आज ‘हे’ मोठे निर्णय घेण्याची शक्यता

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More