Top News क्राईम तंत्रज्ञान देश विदेश

हजारो कोटी चुकून ट्रान्सफर; ‘या’ बँकेच्या चुकीनं भल्याभल्यांची झोप उडाली!

Photo Courtesy- Pixabay

मुंबई | बँकिंग क्षेत्रातले अनेक घोटाळे ऐकले असतील किंवा पाहिले असतील. अशाच एक घोटाळ्यावर ‘स्काॅम 1992’ वेब सीरिज देखील निघाली आहे. अशीच एक धक्कादायक घटना एका बँकेत घडली. एक-दोन नव्हे तर तब्बल 3650 कोटींचा घोटाळा समोर आला आहे. हा घोटाळा बँकिंग क्षेत्रातला आतापर्यतचा सर्वात मोठा घोटाळा मानला जात आहे.

या घोटाळ्याची सुरवात होते ती, ऑगस्ट 2016 मध्ये… बँकिंग क्षेत्रातील महत्वाची बँक मानली जाणारी सिटी बँक एक अग्रगण्य बँक आहे. सिटी बँकने रेवलॉन या कॉस्मेटिक कंपनीला कर्ज दिले होते. पण चुकून सिटी बँककडून या कंपनीला 3650 कोटी रुपये पाठवले गेले. साॅफ्टवेअर जुनं झाल्यानं हा घोळ झाला असल्याचं कारण सिटी बँकेनं दिलं आहे. त्याहून मजेशीर गोष्ट अशी की, आता रेवलॉन हे पैसे द्यायला तयार नाही. या चुकीची शिक्षा बँक अजूनही भोगत आहे.

गेल्या 5 वर्षांपासून हे प्रकरण रखडलेलं आहे. सध्या प्रकरण अमेरिकन न्यायालयात गेलं आहे. ‘ही चूक सॉफ्टवेअरमधून झाली नसून मानवी चुकीमुळे झाल्याचं न्यायालयासमोर मांडलं गेलं आहे. पण सॉफ्टवेअर एररच असल्याचं कंपनीचं म्हणणं कायम आहे. सिटी बँकेला 3650 कोटी रुपयांचा भुर्दंड बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे बँकिंग क्षेत्रातला हा घोटाळा काय वळण घेईल यावर सर्वांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘…हा तर सरकारच्या अस्तित्वहीनतेचा पुरावा’; गजानन मारणेनेेने काढलेल्या मिरवणुकीवरून चित्रा वाघ आक्रमक

आज ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त झालं सोनं; पाहा काय आहे भाव…

तहानलेल्या सापाला वनाधिकाऱ्याने बाटलीने पाजलं पाणी, पाहा व्हिडिओ

फास्ट-टॅगवरून मनसे नेत्या रूपाली ठोंबरेंचा टोल नाक्यावर राडा, व्हिडीओ व्हायरल!

…म्हणून महाराष्ट्रात पुन्हा कोरोनानं डोकं वर काढलं- आशिष शेलार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या