बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जिओला सर्वात मोठा धक्का! तब्बल ‘इतक्या’ कोटी ग्राहकांनी सोडली साथ

मुंबई | भारत तंत्रकौशल्यात चांगलीच प्रगती करताना दिसत आहे. अशातच आता भारतातील नोव्हेंबर आणि डिसेंबर 2021 मधील मोबाईल वापरकर्त्यांच्या आकडेवारीत घट नोंदवण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांत सेवेचा दर्जा टिकवण्यासाठी दूरसंचार कंपन्यांनी रिचार्जचे दर वाढवलेले आहेत. ग्राहकांना याचा चांगलाच फटका बसलेला पहायला मिळत आहे.

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील 1.28 कोटी वापरकर्त्यांनी मोबाईल वापरायचं बंद केलं आहे. याचा सर्वात मोठा फटका जिओ कंपनीला बसला आहे. दूरसंचार क्षेत्रात सर्व कंपन्यांनमध्ये सर्वोच्च क्रमांक जिओचा होता. ट्रायच्या आकडेवारीनुसार जिओने डिसेंबर महिन्यात सर्वात जास्त ग्राहक गमावले आहेत.

एअरटेल आणि बीएसएनल सोडून इतर दूरसंचार कंपन्यांचे ग्राहक कमी झाले आहेत. मात्र एअरटेल आणि बीएसएनलच्या ग्राहकसंख्येत चांगलीच वाढ झाली आहे. डिसेंबरमध्ये एअरटेलने चार लाख 75 हजार नवीन ग्राहक जोडले आहेत. त्यामुळे एअरटेलची एकूण ग्राहकसंख्या 36.57 कोटी झाली आहे. बीएसएनलच्या ग्राहकसंख्येतही ठरावीक प्रमाणात वाढ झालेली आहे. या महिन्यात बीएसएनलच्या ग्राहकसंख्येत 47 हजारांची भर पडलेली पहायला मिळते.

नोव्हेंबरमध्ये खाजगी दूरसंचार कंपन्यांनी रिचार्चचे दर 18 ते 25 टक्क्यांनी वाढवले आहेत. त्यामुळे ग्राहकांनी परवडतील असे मार्ग शोधण्यास सुरवात केली आहे. दरम्यान, मुंबईतही ग्राहकांना नेटवर्कचे प्रॉब्लेम येत असल्याने त्यांनीही विविध पर्याय शोधण्यास सुरवात केली आहे. आता रिचार्चचे दर कमी होतील की वाढतच जातील हे पाहणं महत्त्वाच ठरणार आहे.

 थोडक्यात बातम्या – 

मोठी बातमी! ‘या’ कारणामुळे राज ठाकरेंच्या कार्यक्रमातील स्टेज कोसळला

“योगी सरकारला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी भाजपला मतदान करा”

Kirit Somaiya: “उद्धव ठाकरे हिंमत असेल तर मला अटक करा”

Unlockविषयी अजित पवारांनी दिले महत्त्वाचे संकेत, म्हणाले…

आता मिळणार बिनव्याजी कर्ज, मोदी सरकारने आणली ‘ही’ भन्नाट योजना

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More