बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विकेंड लॅाकडाऊनबद्दल सर्वात मोठी अपडेट, सरकारनं ‘या’ लोकांना दिली सूट

मुंबई | राज्यात 30 एप्रिलपर्यंत विकेंड लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे शुक्रवारी रात्री 8 पासून ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत लॉकडाऊनचे नियम पाळावे लागणार आहेत. शनिवारी आणि रविवारी पूर्ण लॉकडाऊन असणार आहे. फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच घराबाहेर पडता येणार आहे.

राज्यात दिवसा संचारबंदी आणि रात्री कर्फ्यू लागू असल्याने रात्री 8 नंतर कोणालाही विनाकारण घराबाहेर बाहेर पडता येणार नाहीये. पण आता मुंबई महापालिकेने यामध्ये आणखी काही व्यक्तींना सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत विकेंड लॉकडाऊमध्ये परीक्षार्थी विद्यार्थी, घर कामगार, वाहन चालक, ज्येष्ठ नागरीकांची काळजी घेणारे तसेच होम डिलिव्हरी सेवा देणाऱ्या व्यक्तींना वगळण्यात आलं आहे.

वेगवेगळ्या परिक्षा आणि स्पर्धा परिक्षांना जाण्यासाठी विकेंड लॉकडाऊमध्ये विद्यार्थ्यांना परवानगी असणार आहे. त्यांच्यासोबत जाणा-या एका व्यक्तीस किंवा पालकास परवानगी असेल. त्याकरता विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट ग्राह्य धरले जाणार आहे. घरकाम करणाऱ्या महिला, कूक, ड्रायव्हर, नर्स आणि ज्येष्ठ नागरिकांचे मदतनीस यांना सकाळी 7 ते रात्री 10 या वेळेत संबंधित घरांमध्ये जाण्यास परवानगी असेल.

दरम्यान, स्विगी, झोमॅटोसारख्या इ-कॉमर्स कंपन्यांना आठवड्यातील सातही दिवस 24 तास होम डिलीव्हरी साठी परवानगी राहणार आहे. विकेंड लॉकडाऊनमध्ये नागरिकांना हॉटेलमध्ये जावून पार्सल घेता येणार नाही. ते डिलिव्हरी बॉयकडूनच मागवता येईल विकेंड लॉकडाऊनमध्ये अन्नपदार्थ आणि फळे विकणा-या फेरीवाल्यांना परवानगी असेल. मात्र, केवळ पार्सल सुविधा द्यावी लागेल, तिथं उभे राहून लोकांना खाता येणार नाही.

थोडक्यात बातम्या – 

‘परिक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात पंतप्रधानांचा विद्यार्थ्यांसह पालकांना ‘हा’ महत्वाचा सल्ला

पुणेकरांनो काळजी घ्या!; कोरोना रुग्णवाढीची आजची आकडेवारी देखील अत्यंत धक्कादायक

“अनिल परबांच्या राजीनाम्यासाठी देखील आता न्यायालयाचे आदेश येण्याची वाट बघावी लागेल का?”

सचिन वाझेंनी केलेल्या आरोपांवर अनिल परब म्हणाले, ‘बाळासाहेबांची आणि माझ्या मुलींची शपथ घेऊन सांगतो…’

लवकरच देवेंद्र फडणवीस घेणार शरद पवार यांची भेट!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More