बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘देव तारी त्याला कोण मारी’; बसच्या चाकाखाली येऊनही दुचाकीस्वार वाचला, पाहा व्हिडीओ

मुंबई | गुजरातमधील एका अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आपल्याकडे मराठीत एक म्हण आहे, देव तारी त्याला कोण मारी….. हा व्हिडीओ पाहून आपल्याला ही म्हण आठवते. गुजरातमधील दाहोद येथे काळजाचा ठोका चुकवणारा अपघात घडला आहे. दाहोद जिल्ह्यात महामार्गावर एका तरुणाला बसने धडक दिली. या जोरदार धडकेतही तो सुखरूपपणे बचावला आहे.

दुचाकी बसला धडकली आणि दुचाकी 10 फूट पुढे गेली आणि दुचाकीस्वार बसखाली आला. पण तो दुचाकीस्वार भाग्यवान होता. बसच्या चालकाने बसचे ब्रेक दाबले. यामुळे दुचाकीस्वार थोडक्यात वाचला.

बसखाली आल्यानंतर तो तरुण गंभीर जखमी झाला असावा, असं वाटलं पण तो बसखालून सुरक्षितपणे उठतो. महामार्गावरून जाणारे प्रवासी त्या तरुणाला बाईक उचलण्यास मदत करत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. काही तासांत या व्हिडीओ हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच अनेकांनी हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर देखील केला आहे.

 

 

थोडक्यात बातम्या- 

मोठी बातमी! एअर इंडियाला खरेदी करण्यासाठी ‘या’ कंपनीने लावली बोली

टाइम मॅगझिनच्या 100 ‘सर्वात प्रभावशाली लोकांच्या’ यादीत मोदींसह या व्यक्तींचा समावेश

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

चिंताजनक! राज्यातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा वाढला, वाचा आकडेवारी

डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या प्रकरणात न्यायालयाने दिला ‘हा’ मोठा निकाल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More