बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बैलगाडीवरून कोसळलात तसे सायकलवरून घरंगळत जाऊ नका म्हणजे झालं”

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसने इंधन दरवाढीवर आक्रमक भुमिका घेतल्याचं चित्र आहे. काँग्रेस महागाईच्या विरोधात रस्त्यावर उतरुन मोदी सरकारचा निषेध करत आहे. त्यातच आता काँग्रेस हँगिंग गार्डनपासून राजभवन पर्यंत सायकल रॅली काढून राज्यपालांना निवेदन देणार आहे. गुरुवारी काँग्रेस नेते राज्यपालांना भेटणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली होती. काँग्रेसच्या या आंदोलनावर भाजपने टीका केली आहे.

नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस शिष्टमंडळ राज्यपालांना निवेदन देण्यासाठी मलबार हिल हँगींग गार्डन येथून काँग्रेस नेते सायकलने राजभवनावर जाणार आहे. बैलगाडीवरून कोसळले आता काँग्रेस जशी घरंगळत जात आहे तशी. मलबार हिलच्या उतारावरून सायकलवरून घरंगळत जाऊ नका म्हणजे झालं, अशी टीका भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.

मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस नेत्यांनी बैलगाडीतून मोर्चा काढला होता. या मोर्चादरम्यान काँग्रेस नेते बैलगाडीवर चढले होते. मात्र, बैलगाडीवर वजन वाढल्याने ती कोसळली आणि बैलगाडीत असणाऱ्या कार्यकर्त्यांबरोबर काँग्रेस नेते जमिनीवर कोसळले होते. या मुद्याला धरून केशव उपाध्ये यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.

दरम्यान, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाचा फटका सामान्य जनतेला बसत आहे. इंधन, गॅस, खाद्यतेल, डाळींच्या किमती दिवसेंदिवस वाढतच आहेत. जगणे मुश्कील केलेल्या या सरकारविरोधात काँग्रेसने आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे. जनतेचा आवाज केंद्र सरकारच्या कानावर पडेल आणि झोपी गेलेल्या मोदी सरकारने जागे होऊन जनतेला दिलासा द्यावा यासाठी काँग्रेसचा संघर्ष सुरु आहे, असं नाना पटोले यांनी म्हटलं होतं.

थोडक्यात बातम्या-

‘खासगी कामासाठी सरकारी विमानाने प्रवास का केला?’; न्यायालयाने उर्जामंत्र्यांकडे मागितलं उत्तर

“एक मुलगा अभ्यास करायचा नाही, पण नंबर वन यायचा, मुख्यमंत्र्यांचं तसंच आहे”

पुण्यातच तयार होतेय ‘भारतातली पहिली mRNA’ कोरोना लस; वाचा संपुर्ण माहिती

धक्कादायक! 12वीचे मार्क वाढवून देतो म्हणत शिक्षकाची विद्यार्थीनीकडे शरीरसुखाची मागणी

13 राज्यांतील सर्वेक्षणात ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नंबर 1’

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More