बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लॉजमध्ये नग्नावस्थेत आढळले जोडप्याचे मृतदेह अन् उडाली खळबळ

पुणे | राज्यात गुन्हेगारीच्या घटनांत (Crime) मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एकीकडे गुन्हेगारीने सगळेच त्रस्त झाले असताना एका धक्कादायक घटनेनं पिंपरी-चिंचवड हादरलं आहे. पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) परिसरातील एका लॉजमध्ये जोडप्याचं मृतदेह नग्नावस्थेत आढळलं आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पिंपरी-चिंचवड येथील दिघी (Dighi) परिसरातील एका लॉजमध्ये ही घटना घडली आहे. प्रकाश ठोसर आणि त्याची प्रेयसी आश्विनी चव्हाण हे जोडपं बुधवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास दिघीतील अथर्व लॉजमध्ये गेले होते. त्यानंतर खूप प्रयत्न करूनही ते दरवाजा उघडत नसल्याने कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या चावीने दरवाजा उघडला.

दरवाजा उघडताच कर्मचाऱ्यांना त्या तरूणाचा मृतदेह नग्नावस्थेत पंख्याला लटकलेला दिसला तर त्याच्या प्रेयसीचा मृतदेह तशाच अवस्थेत बेडवर आढळून आला. हे दृश्य पाहाताच हॉटेल कर्मचाऱ्यांनी पोलिसांना कळवलं. त्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी येत झाडाझडती घेतली व ते मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. (Bodies Of Couple Found Naked In Lodge)

या जोडप्यात काही वादविवाद झाले आणि या तरूणाने त्याच्या प्रेयसीची हत्या केली व स्वत: गळपास घेत आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. झाडाझडती दरम्यान या दोघांकडे त्यांचं ओळखपत्र सापडलं. यातून त्यांचं नाव, पत्ता ही महत्वाची माहिती मिळाली असल्याचं, पिंपरी- चिंचवडचे पोलीस आयुक्त मंचक इप्पर यांनी सांगितलंं आहे.

थोडक्यात बातम्या-

लालपरी पुन्हा धावली! तब्बल ‘इतके’ कर्मचारी कामावर परतले

‘टोमॅटो पेट्रोलपेक्षाही महागलं’; वाढत्या महागाईवरुन शिवसेनेचे मोदी सरकारवर ताशेरे

“तात्काळ निलंबन करा, संविधान दिनी तरी…”, चित्रा वाघ कडाडल्या

‘…तर भाजपने आता आमच्यासोबत मिळून राज्य करावं’, राऊतांची खुली ऑफर

“तुमचं नेमकं धोरण काय? कोंबड्या वाचवणं की माणसं”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More