देश

खळबळजनक! विधान परिषद उपसभापतींची आत्महत्या, रेल्वे रुळावर सापडला मृतदेह

बंगळरु | कर्नाटक विधान परिषदेचे उपसभापती आणि जेडीएस नेते एसएल धर्मगौडा यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रेल्वे रुळावर धर्मगौडा यांचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. पोलिसांना एक सुसाईड नोट देखील सापडली आहे.

माजी पंतप्रधान आणि जेडीएस नेते एच डी देवेगौडा यांनी देखील या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. कर्नाटक विधान परिषदेचे उपसभापती एसएल धर्मगौडा यांची आत्महत्या ही अत्यंत धक्कादायक घटना असल्याचं म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वी कर्नाटक विधान परिषदेत काँग्रेस नेत्यांनी धर्मेगौडा यांच्यासोबत धक्काबुक्की केली होती. इतकंच नाही तर त्यांना खुर्चीतून खालीही खेचलं होतं. त्यामुळे ते चर्चेत आले होते.

थोडक्यात बातम्या-

चक्क शिक्षिका चालवत होती सेक्स रॅकेट; सत्य बाहेर येताच पोलीसही चक्रावले!

“पुणे महापालिका निवडणुकीत भाजप-आरपीआयचे 100 हून अधिक नगरसेवक निवडून आणणार”

‘जेव्हा काँग्रेस पक्ष करेल बंड, तेव्हा…’; कविता करत रामदास आठवलेंचा सरकारला टोला

…तर मी फासावर जायला तयार; राष्ट्रवादीच्या मेहबूब शेख यांनी ‘त्या’ युवतीचे आरोप फेटाळले!

”नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्या”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या