मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज नाशिकमध्ये कार्यकता मेळावा घेतला. यामध्ये शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांची खबर घेतली. 2014 च्या वेळी हिंदुत्व का आठवलं नाही, असा सवाल यावेळी त्यांनी केला. जेव्हा जेव्हा शिवसेनेवर आक्रमण झालं आहे तेव्हा शिवसेना दुप्पटीने उभारली आहे. हे लक्षात ठेवा, असा इशारा त्यांनी दिला आहे.
धनुष्य बाण आमचा आहे. धनुष्यबाण आमचा प्राण आहे. आधी प्राण जाईल मग धनुष्यबाण जाईल. चिन्हावर हक्क सांगणाऱ्यांना राऊतांनी या भाषेत उत्तर दिलं. आमचा महाराष्ट्र, आमची माती, आमची माणसं अस वक्तव्य त्यांनी केलं. आमचे हायकंमाड म्हणजे मातोश्री. आम्ही लाल किल्याला सलाम करत नाही. आम्ही रायगडाला नमस्कार करतो, असं म्हणत एकनाथ शिंदेच्या दिल्ली दोऱ्यावर राऊतांनी टीका केली.
बंडखोर आमदाराबद्दल बोलताना त्यांनी गुलाबराव पाटलांवर घणघणाती टीका केली. 50 कोटी पचणार नाहीत. गुलाबरावाचा जुलाबराव होईल समजणारही नाही. बंडखोरांनी आधी ठरवावं त्यांनी शिवसेना का सोडली. रोज नवीन कारण शोधू नयेत. असंही ते म्हणाले. बंडखोर आमदाराचा गद्दार असा उल्लेख त्यांनी केला. सेनेशी गद्दारी करणाऱ्याचं करिअर संपणार हे लक्षात ठेवावं, असा इशारा त्यांनी दिला आहे.
दिल्लीला महाराष्ट्राचे तीन तुकडे करायचे आहेत. त्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. शिवसेना फोडण्यासाठी लाखो रूपये मोजले गेले असल्याचा आरोप त्यांनी केला. शिवसेनेच्या अश्रूमध्ये 40 आमदार वाहून गेले. 40 गेले म्हणजे शिवसेना संपत नाही, असं यावेळी त्यांनी म्हटलंय.
थोडक्यात बातम्या
काँग्रेसचे ते सात आमदार अडचणीत; हायकमांड मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
संजय राऊतांचा बंडखोर आमदारांना इशारा, म्हणाले ‘हिंमत असेल तर…’
“50 कोटी पचणार नाहीत, गुलाबरावचा जुलाबराव होईल”
मोठी बातमी! शिंदे सरकारमध्ये गृहमंत्रीपदासाठी ‘या’ नेत्याचं नाव चर्चेत
“आम्हाला संपलेला पक्ष म्हणून हिणवलं, त्यांच्याकडे आज ना पक्ष आहे ना चिन्ह”
Comments are closed.