बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लग्नात मंत्र म्हणता म्हणता ब्राह्मण दमला; रिकाम्यावेळात नवरा-नवरीने केलं असं काही की…, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | कोरोना काळात सरकारने लग्नसमारंभ, इतर कार्यक्रम हे मार्यादित लोकांमध्ये करता येणार असल्याचं सांगितलं आहे. यामुळे सगळे कार्यक्रम कमी खर्चात, कमी लोकांमध्ये होतात. तेव्हापासून अनेकांच्या लग्नाचे बार उडायला सुरूवात झाली आहे. सोशल मीडियावर लग्नातील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात.

बरेचसे नवरा-नवरी आपल्या लग्नात वेगवेगळ्या पोझ देऊन तो क्षण फोटोच्या माध्यमातून टिपूण ठेवतात. तर कहीजण त्या सगळ्या सोहळ्याचा, कार्यक्रमाचा व्हिडीओ शूट करतात. तसेच काहीजण सध्या इंस्टाग्रामवर सुरू असलेला रिल्स बनवण्याचा ट्रेन्ड फॉलो करतात. त्या प्रसंगाला सूट होईल, अशा गाण्यावर व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर शेअर करतात.

अशातच एका नवरा-नवरीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक लग्न सोहळा सुरू असल्याचं पाहायाला मिळतं आहे. सप्तपदीचा होम सुरू असताना ब्राम्हण मंत्र म्हणून म्हणून दमला आहे. त्यामुळे रिकाम्यावेळात काय करायचं म्हणून, चक्क नवरा-नवरी मंडपातच एक खेळ खेळत आहेत. ते दोघे त्या सप्तपदीच्या होमापुढेच जमिनीवर बसले आहेत.

नवरदेवाच्या हातात एक पाण्याची लहानशी बॉटल असून, तो ती हवेत उडवत आहे. त्यानंतर नवरीही ती पाण्याची बॉटल आपल्या हातात घेते आणि हवेत उडवते. ती बॉटल हवेत उडवल्यानंतर जमिनीवर पडताना ती सरळ उभी राहते की नाही हे ते पाहत आहेत. तसेच त्या दोघांच्या मागे खुर्चीवर एक आजी आणि अजोबा आहे. तेही रिकाम्यावेळेत काही करायला नसल्यामुळे कंटाळलेले असल्याचं दिसत आहे.

पाहा व्हिडीओ-

 

View this post on Instagram

 

A post shared by Naughty Society (@_naughtysociety)

थोडक्यात बातम्या-

‘मराठा आरक्षणासाठी शरद पवारांनी पुढाकार घ्यावा’; संभाजीराजेंची पवारांकडे मागणी

फोन वरुन ओळख, लाॅजवर भेट अन् नंतर घडला धक्कादायक प्रकार

नेहरूंच्या स्मृतीदिनी वाजपेयींचा व्हिडीओ शेअर करत जयंत पाटलांचा भाजपला टोला, पाहा व्हिडीओ

नदीवर पाणी प्यायला गेलेल्या कुत्र्यावर मगरीनं केला हल्ला अन्…, पाहा व्हिडीओ

लॉकडाऊनचं काय करायचं?; कॅबिनेट मंत्र्यांनाच कळेना,कुणी म्हणतंय वाढवावा, कुणी म्हणतंय नको!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More