बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ओडिशातील धक्कादायक घटना; पाठवणीवेळी खूप रडणं नवरीच्या जीवावर बेतलं

नवी दिल्ली | लग्नानंतर प्रत्येक मुलीला तीचं घर सोडून सासरी जावं लागतं. सगळी नाती, बालपणीच्या आठवणी अशा अनेक गोष्टी मागे सोडून तिला सासरी जाताना होणारं दुःख हे शब्दात सांगणं अवघड आहे. मात्र ओडिशातील एका तरूणीला खूप रड रडणं जीवावर बेतलं आहे. पाठवणी दरम्यान प्रचंड रडल्यामुळे तरूणीला ह्रद्याचा झटका आल्याने तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ओडिशातील सोनपूर जिल्ह्यातील जुलुंदा गावात ही घटना घडली. गुप्तेश्वरी साहू हिचा विवाह गुरुवारी संध्याकाळी बोलंगीर जिल्ह्यातील बिसीकेसन प्रधानसोबत झाला. प्रथेनुसार शुक्रवारी सकाळी तिच्या पाठवणीची तयारी सुरु होती. सासरी जाण्यासाठी गुप्तेश्वरी निघत होती, तोच तिला हुंदका अनावर झाला आणि रडता-रडताच ती बेशुद्ध पडली.

गुप्तेश्वरीला तातडीने डुंगुरीपल्लू कम्युनिटी हेल्थ सेंटरला पाठवण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केलं. कार्डिअ‍ॅक फेल्युअरमुळे गुप्तेश्वरी साहूचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं.

पाठवणी करताना ती सातत्याने रडत होती. आम्हाला माहित आहे की ती अतीव दुःखात होती. तिच्या वडिलांचं काही महिन्यांपूर्वीच निधन झालं होतं, असं एका गावकऱ्याने सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“शिवसेनेत प्रवेश केलेल्या सचिन वाझेंकडे सर्वच महत्त्वाच्या केसेस कशा?”

खळबळजनक! अज्ञात तरूणीने पूजा चव्हाणच्या बहिणीचा मोबाईल चोरला

‘त्या रात्री तावडे नावाच्या माणसाचा फोन अन्…’; मनसुख हिरेन यांच्या पत्नीने दिली धक्कादायक माहिती

‘या’ उड्डाणपुलाला शरद पवारांचं नाव द्या; राष्ट्रवादीची मागणी

“वझे बिझे वाजत गेेले, आम्हाला त्यांची भिती दाखवू नका”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More