बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लग्नात नवरीने केली धमाकेदार एंट्री, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

नवी दिल्ली | सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हिडीओ व्हायरल होत आहेत. विशेष बाब म्हणजे व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये लग्नाचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात आसतात. लग्न म्हणलं की काहीतरी गम्मत होतेच. कधी मजोशीर तर कधी ह्रदयाला लागणारी. अशातच सध्या एक नवरी तिच्या लग्नात वेगळ्याच स्वॅगमध्ये एंट्री करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हा व्हिडीओ नक्की कुठला आहे हे अद्याप समोर आलेलं नाही. मात्र या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत. या व्हिडीओमध्ये नवरी तिच्या मैत्रिणीसोबत मंडपात एन्ट्री करताना पाहायला मिळते. यात तिची मैत्रिण दुचाकी चालवत असून तिच्या मैत्रिणीला अर्थात नवरीलीला तिची मैत्रिण दुचाकीवरुन मंडपात नेत आहे.

व्हिडीओमधील नवरीने हिरवा आणि पिवळ्या रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे. संबंधित नवरी ही खरी नवरी नसून एक माॅडेल आहे. तिचं नाव आरती राजपूत असं आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील ‘विटी-वेडींग’ नावाच्या आकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

या व्हिडीओला 33 हजार पेक्षा जास्त लोकांनी पाहिलं आहे. या व्हिडीओला ‘मी माझ्या मैत्रिणीची वरात स्वतःच घेऊन जाणार’, असं कॅप्शन देण्यात आलं आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात फाॅरवर्ड करण्यात येत असून यावर अनेक कमेंट्स देखील आल्या आहेत.

पाहा व्हिडीओ:

थोडक्यात बातम्या-

संजय राठोडांशी ‘ती’ तब्बल 90 मिनिटे बोलली; पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर

कुणाला एवढी खूमखूमी आली असेल तर समोर या, स्वत:च्या पायावर याल पण…- संजय राऊत

भारतासाठी आणखी एक आनंदाची बातमी; महिला हाॅकी संघाची सेमीफायनलमध्ये धडक

विरोधकांच्या गोंधळामुळे केवळ 18 तास झालं संसदेचं कामकाज; इतक्या कोटींचं नुकसान

‘ही घ्या शिवसेनेच्या बाटग्यांची यादी’; राऊतांच्या अग्रलेखाला नितेश राणेंचं प्रत्युत्तर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More