बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“इंग्रजांनी भारताची लूट केली, त्यांच्यावरचा राग अजूनही डोळ्यात माझ्या सलत आहे”

मुंबई | इंग्रजांनी आक्रमण करून भारताची फार लूट केल्याची नोंद इतिहासात नमुद आहे. त्यांच्यावरचा राग अजूनही माझ्या मनातून गेला नाही. मात्र आपण राजकीय गुलामगिरीतुन मुक्त झालो आहे. परंतु आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, वैचारीक गुलामगिरीतुन मुक्त कधी होणार?, असा सवाल रामदेव बाबा यांनी एका कार्यक्रमात केला आहे.

भारताच्या समाज जीवनाच्या विकासाबद्दल बोलताना रामदेव बाबा म्हणाले की, शेती, उद्योग, आरोग्य तसेच संशोधन क्षेत्रात एखादा राष्ट्र प्रगती करतो तेव्हा त्यामध्ये एखाद्या विशिष्ट तत्वाचा समावेश असतो, अस नाही तर सगळ्या तत्वाचा समावेश केेलेला असतो. जर असं झालं तर देशाचा सर्वांगीण विकास होतो, असं रामदेव बाबा म्हणाले.

मी लहानपणापासुन भारतात जातपात, प्रांतीक, भाषीक धर्मावरून भेदभाव होत असल्याचं पाहत आलो आहे. परंतु आता भारताला या गाष्टीमधून मुक्त झालेलं बघायचं आहे, अशी अपेक्षा रामदेव बाबांनी केली आहे.

दरम्यान, इंग्रजांनासाेबत माझं काहीच वैर नाही आहे परंतु माझ्यात एक झंझावत आहे. वीरता, साहस, पराक्रम आणि स्वाभिमानाची भावना आहे. आपल्याला अजूनही बाहेरच्या देशांवर अवलंबुन राहवे लागत आहे. देश आत्मनिर्भय व्हावा त्याचबरोबर देशांनी विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती करावी, असंही मत रामदेव बाबांनी व्यक्त केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

ठाकरे सरकारच्या ‘या’ निर्णयानंतर अभिनेता प्रशांत दामले यांचा सरकारला टोला, म्हणाले…

रानडे इन्स्टिट्यूटच्या स्थलांतराविरोधात विद्यार्थ्यांना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा!

“मोदी सरकार राहुल गांधींना घाबरतंय”

…म्हणून मीराबाई चानूच्या भेटीनंतर सलमान खान झाला ट्रोल!

‘कोल्हापूरचं नाव कलापूर करावं’; अभिनेता सचिन पिळगावकरांची मागणी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More