खेळ

‘या’ बंधूंना विक्रमाची संधी! प्रथमच एकत्र खेळणार आंतरराष्ट्रीय सामना?

वेलिंग्टन | न्यूझीलंडविरुद्धची एकदिवसीय मालिका खिशात घातल्यानंतर भारतीय संघ बुधवारपासून सुरू होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी सज्ज झाला आहे. पहिल्या सामन्यात नवीन चेहरेही दिसणार आहे, त्यात कृणाल पांड्याला संघात संधी मिळते का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सामन्यात कृणालला अंतिम अकरा खेळाडूंमध्ये खेळण्याची संधी मिळाल्यास पांड्या बंधूंच्या नावे एक विक्रमाची नोंद होईल. हार्दिक व कृणालही आंतरराष्ट्रीय सामन्यात एकत्र खेळण्यासाठी उत्सुक आहेत. 

हार्दिक व कृणाल कारकिर्दीत प्रथमच एकाच आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळण्याची शक्यता आहे. सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या हार्दिकचे संघातील स्थान पक्के आहे. 

दरम्यान, अमरनाथ आणि पठाण बंधूनंतर भारताकडून एकाच आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळणारे ते तिसरे बंधू ठरतील. 

महत्वाच्या बातम्या-

-नरेंद्र मोदींचा ‘किंगमेकर’ आता शिवसेनेच्या गोटात?

-सायकलिंग स्टंटचा काळजाचा ठोका चुकविणारा व्हीडिओ नक्की बघा!

-“राजकारणातही भरपूर रेडे आहेत, पण…”, मुख्यमंत्र्यांचा रोख कुणाकडे?

अण्णांच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खळखट्याक करणार- तृप्ती देसाई

-मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात “वाद सोडा आता…” त्यावर शिवसेनेचे अर्जुन खोतकर म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या