बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यातील हत्येचं सत्र सुरूच; साताऱ्यातील पोलीस अधिकाऱ्याच्या आईची पुण्यात हत्या

पुणे | पुण्यात दिवसेंदिवस गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी पोलीस हवालदाराची गळा चिरुन निर्घृण हत्या करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच पुण्यातील वारजे-माळवाडी परिसरात एका महिलेची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

पुण्यातील वारजे माळवाडी येथे एका व्यक्तीला अज्ञात महिलेचा मृतदेह अढळला. ही घटना सुमारे सकाळी साडेपाचच्या दरम्यान समोर आली. व्यक्तीने पोलिसांना याबाबतची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रकरणाचा तपास केल्यानंतर संबंधित मृत महिलेच्या डोक्यात राॅड घालून तिची हत्या केली असून महिला ही साताऱ्याच्या एका पोलीस अधिकाऱ्याची आई असल्याचं समोर आलंय.

संबंधित मृत महिलेचं नाव शाबाई शेलार असं आहे. तसेच शाबाई यांच्या पोलीस अधिकारी असलेल्या पुत्राचा नाव विठ्ठल अरुण शेलार असं आहे. शाबाई या पुण्यातील भाजी मंडईजवळ भंगार विकण्याचा व्यवसाय करत होत्या. भाजी मंडईजवळच त्याचं दुकान असून त्या तिथंच राहत होत्या.

दरम्यान, संबंधित घटनेची माहिती मिळताच रामनगर येथे मोठ्या प्रमाणात जमाव जमला. या प्रकरणानंतर संबंधित ठिकाणी वाद निर्माण झाला असून पोलिसांनी कडक बंदोबस्त वाढवला. तसेच घटनेचा तपास चालू असून आरोपीला देखील शोधण्यात येत आहे. या हत्येमागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

थोडक्यात बातम्या-

मंगळावर अज्ञात हेलिकॉप्टरचा वावर? नासाच्या रोव्हरने पात्यांचा आवाज केला कैद, पाहा व्हिडीओ

पुण्यात देशातलं पहिलं ‘चाईल्ड कोविड सेंटर’ उभारणार; पुणे महापालिका अलर्ट मोडवर

मराठमोळ्या ऑक्सिजन संशोधकाचा ऑक्सिजनअभावी मृत्यू; डॉ. भालचंद्र काकडे यांचं निधन

कोरोना रुग्णांना होतोय ‘म्युकर मायकोसिस’ हा गंभीर आजार; 20 जणांचे डोळे निकामी

पुण्यात भितीचं वातावरण तयार होऊ नये म्हणून मुरलीधर मोहोळ यांनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More