बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

400 फूट खोल दरीत कोसळली कार, पुढे जे घडलं ते ऐकून तुम्हीही व्हाल चकीत

सातारा | आजकाल आपघात होण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे. दररोज यासंबंधी बातमी कानावर पडत असते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तर अशाप्रकारच्या अनेक घटना घडत असतात. अशातच सातारामध्ये एक अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

सातारा जिल्ह्यातील वाईहून पाचगणीला जाणाऱ्या एका कुटुंबियांच्या कारचा अपघात झाला. गाडी दरीत कोसळली. आश्चर्याची बाब म्हणजे गाडी 400 फूट खोल कोसळूनही त्या गाडीतील कोणालाही काही झालं नाही. गाडीतील तीघजण एकदम व्यवस्थित आणि सुखरूप आहेत. त्या कुटुंबियांना नंतर क्रेनच्या मदतीने वर काढण्यात आलं. त्यामध्ये दोन महिला आणि एक पुरूष होता.

संबंधित कुटुंब काही कामानिमित्त वाईला गेले होते. साताऱ्याला परत येताना पसरणीघाटात हा सगळा प्रकार घडला. घाटातील 16 नंबरच्या बसस्टॉपजवळून जाताना गाडी चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं. गाडीचा वेग जास्त असल्यामुळं गाडी संरक्षण भिंतीच्या पलिकडे जाऊन थेट दरीत जाऊन कोसळली.

दरीत गाडी पडल्यानंतर काही फूट अंतरावर जाऊन ती गाडी एका झाडावर अडकली. त्यामुळे गाडीमध्ये असणाऱ्यांपैकी कोणालाही काही झालं नाही. एवढा मोठा अपघात होऊनही त्या तिघांना साध खरचटलं देखील नाही. म्हणतात ना काळ आला होता, पण वेळ आली नव्हती. असंच काहीस या तिघांबरोबर झालं असावं.

थोडक्यात बातम्या-

राज्यातील 10 महापालिकेच्या निवडणूका ‘या’ महिन्यात लागण्याची शक्यता!

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट!

12 तास काम करूनही पगार मिळणार कमी; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

कोरोनाला रोखण्यासाठी लेंसेटच्या तज्ज्ञांनी भारताला दिले ‘हे’ 8 महत्वाचे सल्ले!

आई बापाच्या कष्टाचं चीज, पंढरपुरातील मजूराच्या पोराची इस्रोमध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञपदी निवड

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More