बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लाईव्ह मॅचमध्ये बॅनरला लटकली होती मांजर अन्…; थरारक व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल!

नवी दिल्ली | सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यापैकी काही व्हिडीओ प्रेक्षकांचं मन जिंकून जातात. अशातच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होणारा हा व्हिडीओ फुटबॉल मॅचमधील असून एका मांजरीचा जीव वाचवण्याचं दृश्य यातून पाहायला मिळतंय.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओनं सध्या सगळ्यांचंच लक्ष वेधलं आहे. हा व्हिडीओ मियामीच्या हार्ड रॉक स्टेडियममधला असून मॅच सुरु असताना अचानक एक मांजर स्टेडियमच्या सगळ्यात वरच्या टियरमध्ये बॅनरला लटकलेली दिसतेय. तेथील लोक तिचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.

यादरम्यानच मांजर खाली कोसळते आणि सगळेच ओरडू लागतात. मात्र खाली उभा असलेल्या काही प्रेक्षकांनी अमेरिकी ध्वज पसरवून या मांजरीला कॅच केलं आणि तिचा जीव वाचवला. त्यानंतर मांजर बचावल्याचं समजताच संपूर्ण स्टेडिअममध्ये आनंद व्यक्त करण्यात आला. सगळेच आनंदानं ओरडू लागले.

दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून व्हिडीओवर अनेक प्रतिक्रियाही उमटताना पाहायला मिळत आहे. अनेकांनी यावर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

महाराष्ट्राला तालावर नाचवणाऱ्या ‘शांताबाई’ फेम गायकाची राजकारणात एन्ट्री, ‘या’ पक्षात करणार प्रवेश!

कोरोनामुळे तरुणांच्या फुफ्फुसांवर परिणाम???, संशोधनातून महत्वाची माहिती समोर!

“मोदी सर्वोच्च न्यायालयाचं पण ऐकणार नाहीत मग कोणाचं ऐकणार आहेत?”

महाविद्यालयीन अभ्यासक्रमात आता महाभारत, रामायणाचे धडे, शिक्षणमंत्र्यांनी केली मोठी घोषणा!

“सरकार त्यांच्या विचारांचं समर्थन करणाऱ्या चित्रपटांना क्लीनचीट देतं, नाझी जर्मनीत हेच व्हायचं”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More