Top News देश

मोठी बातमी! आयटी रिर्टन’बाबत केंद्र सरकारने केली मोठी घोषणा

नवी दिल्ली | आयकर परतावा भरण्यास 31 डिसेंबर शेवटची तारीख असल्याने सर्व्हरवर तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे आयटीआर रिटर्न फायलिंगना मुदतवाढीचा मागणी केंद्र सरकारकडे होत होती.

केंद्र सरकारने या मागणीला दाद देत मुदतवाढ दिला आहे. केंद्र सरकारने 12 दिवसांची मुदतवाढ दिली असून 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्थमंत्रालयाने यासंदर्भात घोषणा केली आहे.

ज्यांच्या खात्यांचे ऑडिट शिल्लक आहे त्यांना आणि त्यांच्या पार्टनरसाठी 2020-21 चा आयकर भरण्यासाठी 15 फेब्रुवारीची नवीन डेडलाईन देण्यात आली आहे. त्यासोबतच जीएसटी भरण्यासही 28 फेब्रुवारीपर्यंच मुदतवाढ देण्यात आली आहे.

दरम्यान,  31 जुलैपर्यंत आयकर विवरण सादर करण्याची मुदत असते. मात्र यंदा कोरानाच्या पार्श्वभूमीवर दोनवेळा ही मुदत वाढवून देण्यात आली होती. यामध्ये 31 जुलैनंतर 30 नोव्हेंबर ही अंतिम मुदत होती. त्यात आणखी एक महिन्याची वाढ करून 31 डिसेंबरपर्यंत वाढ करून देण्यात आली होती.

 

 

थोडक्यात बातम्या-

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना आता फक्त ‘इतक्या’ वेळाच देता येणार MPSC परीक्षा, जाणून घ्या!

ईडीचं ऑफिस मोदींच्या घरातून चालतं; बच्चू कडू यांनी टीका

‘सीबीआय’नंतर राज्यात ‘ईडी’लाही ‘नो एंट्री’???; गृहमंत्र्याचं सूचक वक्तव्य

‘भारतीय हद्दीतील काश्मीरमधील लोकांवर अत्याचार होत आहे’; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला

सायरस पुनावाला यांना ‘महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात यावं- बाळा नांदगावकर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या