बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

युएईत रंगणार वर्ल्ड कपचा थरार; पाहा टीम इंडियाचं संपूर्ण वेळापत्रक

मुंबई | आयपीएलनंतर आता युएईमध्ये विश्वचषकाचा थरार आजपासून रंगणार आहे. विश्वचषकासाठी आता सर्वच संघ जय्यत तयारीनिशी सामन्यात उतरणार आहेत. हा विश्वचषक सामना भारतात खेळवला जाणार होता. मात्र कोरोनामुळे हा सामना आता युएईमध्ये खेळवला जात आहे. अशातच भारतीय संघ देखील युएईत पोहचला असून उद्या भारताचा पहिला सराव सामना आहे. त्यामुळे भारतीयांची उत्सुकता आता शिगेला पोहचल्याचं पहायला मिळतंय.

भारताचे दोन सराव सामने होणार आहे. पहिला सामना हा 18 तारखेला तर दुसरा सराव सामना हा 20 तारखेला होणार आहे. त्यानंतर 24 तारखेला भारताचा सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. दुबईच्या इंटरनॅशनल स्टेडियमवर हा सामना खेळवला जाईल. विश्वचषकाच्या फायनलपेक्षा रंगतदार हा सामना होणार असल्याचं सर्वांच्या नजरा आता भारत पाकिस्तान सामन्यावर असणार आहेत.

त्यानंतर 31 ऑक्टोबरला भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुबईच्या इंटरनॅशनल स्टेडियमवर सामना होणार आहे. या सामना भारतासाठी महत्त्वाचा असणार आहे. त्यानंतर 3 नोव्हेेंबरला भारत आणि अफगाणिस्तानचा संघ एकमेकांविरूद्ध भिडणार आहे. त्यानंतर ग्रुप बीचा क्वालियर सामना 5 नोव्हेंबरला होणार आहे. यात ग्रुप बीचा पहिला आणि दुसरा संघ भिडणार आहे.

दरम्यान, 10 नोव्हेंबरला पहिला सेमीफायनल सामना खेळला जाईल. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 11 नोव्हेंबरला दुसरा सेमीफायनल सामना होणार आहे. त्यानंतर 14 नोव्हेंबरला फायनलची लढत होणार आहे.

थोडक्यात बातम्या-

‘माझं शरद पवारांना आव्हान आहे की…’; किरीट सोमय्यांचं पवारांना खुलं आव्हान

भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी सानिया मिर्झाचा मोठा निर्णय! व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडचं पुण्यात जल्लोषात स्वागत; पाहा व्हिडीओ

“बाळासाहेब ठाकरे खरे हिंदूवादी, राज ठाकरे यांच्यात बाळासाहेबांची छबी दिसते”

पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडले असतानाच केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More