बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अन् चक्क मुख्यमंत्र्यांच्या हेलिकाॅप्टरला मारावा लागला धक्का, पाहा व्हिडीओ

गुवाहाटी | आतापर्यंत आपण ट्रक, कार, टेम्पो, दुचाकी, बस यांना धक्का मारताना अनेक वेळा पाहिलं असेल. पण आसाममधून चक्क हेलिकॉप्टरला ढकलतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. आसाममध्ये सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. तसेच होऊ घातलेल्या निवडणुकांची तयारीही युद्धपातळीवर सुरू असल्याचं पाहायला मिळतंय.

आसाममधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांतील महत्त्वाच्या नेत्यांच्या बैठकी आणि दौर्‍यांचं सत्र सुरू आहे. यादरम्यानच आसामचे मुख्यमंत्री एका ठिकाणी दौऱ्यानिमित्त आले असताना दुसऱ्या नेत्याच्या हेलिकॉप्टरला उतरण्यासाठी जागा करून देण्यासाठी चक्क हेलिकॉप्टरला धक्का मारून बाजूला करण्यात आलं.

सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असताना पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये एकूण पाच जण एका हेलिकॉप्टरला धक्का मारत असल्याचं दिसून येतंय तसेच हेलिकॉप्टर आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांचं असल्याचीही माहिती मिळत आहे. सध्या या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असून लोकांनी याच्यावर अनेक हास्यास्पद प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

कुमार गौरव नावाच्या व्यक्तीने आपल्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करून ‘आसामच्या मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर दुसऱ्या एका नेत्याचं हेलिकॉप्टर येणार म्हणून काही लोकांनी धक्का देऊन बाजूला केलं, तसेच निवडणुकीनंतरही आसाममध्ये खुर्चीसाठी अशीच परिस्थिती बनू शकते’ असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओला चांगलीच पसंती देऊन मोठ्या प्रमाणात शेअर केलं आहे.

 

पाहा व्हिडीओ

थोडक्यात बातम्या

“दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा”

आज राज्यसरकारतर्फे कोरोनासंदर्भात ‘या’ 5 महत्वाच्या घोषणा होण्याची शक्यता

कोरोना लसीसंदर्भात नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य; केली ‘ही’ मागणी

नियम धाब्यावर बसवुन साताऱ्यात कशी हजारोंच्या संख्येने पार पडली यात्रा, पाहा व्हिडीओ

कोरोना निगेटिव्ह असतांना दिला कोरोना पाॅझिटिव्हचा रिपोर्ट, अन् जिवंतपणीच केलं मृत घोषित

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More