बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

”अनंत गीतेंची जी अवस्था आहे तिच शिवसैनिकांची आहे, त्यांना कोणी विचारत नाही”

मुंबई | काही दिवसांपुर्वी शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते यांनी केलेल्या वक्तव्यावरुन खळबळ उडाली आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आमचे नेते नसल्याचं म्हटलं होतं. यानंतर राष्ट्रवादीने गीतेंवर घणाघाती टीका केली. अशातच आता क्रेंद्रीय मंत्री नारायण राणेंनी गीतेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

अनंत गीतेंंनी मांडलेला मुद्दा वास्तववादी चित्र आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीची तडजोड पदांसाठीच झाली असून यामध्ये हिंदुत्वाचा आणि निष्ठेचा भाग नसल्याच नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

गीतेंवर कारवाई होणार?, याबाबत बोलताना गीतेंचं आजून काय वाकडं करणार, कदाचित त्यांना फासावर लटकवतील, याशिवाय त्यांना दुसरं काय येतं, असंही राणेंनी म्हणाले. तसेच गीतेंसारखीच शिवसैनिकांची स्थिती आहे, त्यांना कोणी विचारत नसल्याचं म्हणत राणेंनी शिवसेनेला टोला लगावला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी हिंदुत्वाला मूठमाती दिली असल्याने शिवसेनेला हिंदूत्वावर बोलण्याचा अधिकार नाही. तसेच गीते जे बोलले ते 100% खरं आहे, असंही राणेंनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

ओबीसी आरक्षणाबाबत धक्कादायक माहिती समोर!

मोठी बातमी! नाना पटोले आणि बाळासाहेब थोरातांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

‘या’ भारतीय कंपनीची इलेक्ट्रीक बाईक बाजारात दाखल; किंमत पेट्रोल बाईकपेक्षा कमी

“सरकारने घेतलेला निर्णय राजकीय सुडापोटी, अशा चौकशांना मी घाबरत नाही”

”देशात तालिबानी राजवट लागू होऊ देणार नाही, मी जिंकले नाही तर…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More