Top News देश

बच्चू कडूंच्या नेतृत्वात निघणार काॅंग्रेसचा मोर्चा, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

पांढुर्णा |  कृषी कायद्याविरोधात शेतकरी गेल्या दोन महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर आंदोन करत आहेत. तरीदेखील केंद्र सरकारनं यावर कोणताच तोडगा काढला नाहीय. याच पार्श्वभूमीवर शेतकरी कायद्या विरोधात मध्य प्रदेश काँग्रेस महाराष्ट्राचे राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चु कडू यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघणार आहे.

शुक्रवारी 22 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता मध्य प्रदेशातील पांढुर्णा येथे हा मोर्चा निघणार आहे. या मोर्चात युवक काँंग्रेसचे अध्यक्ष आ.निलेश ऊईके यांच्यासह शेकडो काँंग्रेसचे पदाधिकारी व इतर संघटना सहभागी होणार आहेत.

राजकीय इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या पक्षाच्या मोर्चाचे नेतृत्व शेतकरी आणि कष्टकरी वर्गासाठी झटणारी प्रहार संघटना आणि त्याचं नेतृत्व करणारे महाराष्ट्राचे एक राज्यमंत्री आहेत.

दरम्यान, बच्चु कडू यांच्या आक्रमक शैलीने मध्य प्रदेशवासियांच्या मनात सुद्धा स्थान मिळविलं आहे. त्यामुळं या मोर्चाकडं केवळ मध्यप्रदेशच नाही तर महाराष्ट्राचं सुद्धा लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या-

आमच्याकडे आहेर स्वीकारला जाईल, क्यूआर कोड स्कॅन करुन गुगल-पे किंवा फोन-पे करा!

“एमपीएससी संदर्भात आम्ही मार्ग काढू”

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला भीषण आग!

जयंत पाटलांच्या मुख्यमंत्रिपदाच्या इच्छेवर शिवसेनेकडून प्रतिक्रिया; पाटील हे…

…तर जयंत पाटील मुख्यमंत्री होणार; अजित पवारांनीही दिला पाठिंबा

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या