मुंबई | काँग्रेसमध्ये काही फेरबदल हाेणार असल्याच्या चर्चांणा आता पुर्णविराम मिळाला आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांसोबत काँग्रेसचे सहा कार्यकारी अध्यक्षपदाचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
नाना पटोले यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद सोपवण्यात आलं आहे तर सहा कार्यकारी अध्यक्षांपैकी आमदार प्रणिती शिंदे यांच्यावरही ही जबाबादरी सोपवण्याती आली आहे. तर शिवाजी मोघे, बसवराज पाटील, मोहम्मह आरिफ नसीम खान, कुणाल पाटील आणि चंद्रकांत हंडोरे यांची वर्णी लागली आहे.
काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी शिरीष चौधरी, रमेश बागवे, हुसेन दलवाई, मोहन जोशी, रणजीत कांबळे, कैलास गोंरट्याल. बी.एल नगराळे, शरद आहेर, एम.एम नाईक, माणिकराव जगताप यांची निवड करण्यात आली आहे.
दरम्यान, नाना पटोलेंची प्रदेशाध्यक्षपदी निवड केल्यामुळे आता विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाला नेमणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
थोडक्यात बातम्या-
रिहानाचा ख्रिस गेलसोबतचा ड्रेसिंगरूममधील व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
…म्हणून राष्ट्रवादीच्या पदवीधर अध्यक्षाने थेट कॅनडाच्या पंतप्रधानांनाच लिहिलं पत्र
कृषी कायद्यात काय कमतरता हे शेतकरी नेत्यांना सांगता आलं नाही- नरेंद्रसिंह तोमर
“आंदोलनाच्या ठिकाणी खिळे ठोकणं?, हे केंद्र सरकारला शोभत का?”
‘…हे पहिले केंद्राला सांगा’; अजित पवारांनी फडणवीसांना फटकारलं
‘तो माझ्यासाठी क्रिकेटचा देव होता पण आता…’; या मराठी दिग्दर्शकाने सचिनला सुनावलं