बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाचं संकट जात नाही तेच दुसरं संकट, बर्ड फ्ल्यूमुळे देशात पहिला मृत्यू

नवी दिल्ली | देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच कोरोना विषाणूचे नवीन व्हेरिएंट समोर येत आहेत. कोरोना विषाणूच्या या बदललेल्या स्वरुपामुळे देशाला कोरोना संक्रमणाच्या तिसऱ्या लाटेला सामोरं जावं लागू शकतं, असा इशारा तज्ज्ञांनी वर्तवला आहे. कोरोनाचं संकट संपत नाही तेच बर्ड फ्ल्यूनं देशातला पहिला बळी घेतल्याचं समोर येत आहे.

बर्ड फ्ल्यू हा पक्षांमध्ये पसरणारा एक संसर्गजन्य रोग आहे. मात्र या रोगाची आता माणासालाही लागण होत असल्याचं समोर येत आहे. एवढंच नाही, तर बर्ड फ्ल्यूनं यावर्षी देशातील पहिला बळी घेतला आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये H5N1 विषाणूची लागण झाल्यानं 11 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या या रुग्णालयातील सर्व नर्सेस, डाॅक्टर यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे.

बर्ड फ्लूची लागण झाल्यानंतर ताप येणं, घशात खवखव होणं, वा जास्त इन्फेक्शन होणं, सर्दी, श्वास घेण्यास त्रास होणं, पित्त वा कफचा त्रास आणि रोग जास्त पसरला असल्यास निमोनिया होण्याची शक्यता जास्त असते. ही सगळी लक्षणं सध्याच्या कोरोना विषाणूंच्या लक्षणांसारखी असल्यानं सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

दरम्यान, हा रोग संसर्गजन्य असल्यामुळे पक्ष्यांमधून माणसांमध्ये पोहचण्याची जास्त भीती असते. आधीच जगभरात कोरोनाचं सावट असताना आता या जुन्या रोगानं डोकं वर काढल्यानं चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

थोडक्यात बातम्या – 

“तेव्हा मनमोहन सिंगांनी कारवाई केली, तुम्ही कधी करणार?”

“म्हणून मी फिल्म इंडस्ट्रीला गटार बोलते, प्रत्येक चमकणारी वस्तू सोनं नसतं”

‘कोरोना को मत डरो ना…’; रामदास आठवलेंच्या कवितेनं राज्यसभेत एकच हशा

मास्क घालणार नाही म्हणणाऱ्या राज ठाकरेंनी पुण्यात मास्क लावलाच!

“पतीच्या अटकेनंतर शिल्पा कोणत्या परिस्थितीतून जात असेल, याची कल्पनाही करु शकत नाही”

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More