बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ 12 राज्यांनी देशाचं टेंशन वाढवलं; कोरोना रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ

नवी दिल्ली | देशभरात कोरोना रुग्ण संख्येमध्ये घट होताना दिसत होती. अशातच समोर आलेल्या माहितीने लोकांच्या चिंतेत पुन्हा वाढ केली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता देश कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पकडीत असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच महाराष्ट्रसह आणखी 11 राज्यांमध्ये कोरोना मोठ्या प्रमाणात पसरत आहे.

चार दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या 30,000 च्या पुढे गेली आहे. ही वाढ कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा असल्याचं तज्ञांनी म्हटलं आहे. सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट ओसरणार असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला होता.

गेल्या 24 तासांमध्ये 30,773 नवीन कोरोना रुग्ण समोर आले असून 38, 945 संक्रमीत रुग्ण बरे झाले आहे. तर 309 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या 24 तासांमध्ये 84.42 लाख लस देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रसह केरळ, तामिळ नाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मिझोराम, अशा अनेक राज्यांमध्ये कोरोनाचावेग वाढत आहे. यातील केरळ हे अजूनही कोरोनाचं हाॅटस्पाॅट आहे. तसेच राज्यात दररोज 20 हजारपेक्षा जास्त नवीन कोरोना संक्रमीत रुग्ण अढळत आहेत.

थोडक्यात बातम्या-

“शिवसेना आणि आमचं फेव्हिकॉलचं नातं, दिवार तुटणार नाही”

कर बुडवल्याच्या आरोपावर सोनू सूदची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…

“कायद्याची लढाई कायद्यानं लढा कोल्हापूरी चपलेनं लढू नका”

‘येत्या दोन दिवसात…’; चंद्रकांत पाटलांचा खळबळजनक दावा

“सोमय्या यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईचा मुख्यमंत्री कार्यालयाशी काडीचाही संबंध नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More