बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘बाळांनो, आम्ही लगेच येतो’ सांगून कोरोना उपचारासाठी गेलेल्या दाम्पत्याला कोरोनाने गाठलं

कोल्हापूर |  कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने मोठी हानी होत आहे. या लाटेत अनेकांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावलं आहे. यामध्ये अनेकांची संपुर्ण कुटुंबच्या कुुटुंब संपली आहेत. असंत काहीसा प्रकरा कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहूवाडी तालुक्यातील शित्तूरपैकी मलकापूरमधील पाटील कुटुंबोसोबत घडला आहे.

महादेव पाटील पुण्यात एका मोठ्या कंपनीत कामाला होते तर त्यांची पत्नी एक खाजगी कंपनीत चांगल्या पदावर काम नोकरीला होती. ते आपल्या मुलांसोबत पुण्यातच रहायला होते. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ते आपल्या कुटुंबासोबत मुळ गावी गेले. त्यानंतर महादेव पाटील यांच्या पत्नी सीमा पाटील यांना थोडासा त्रास जाणवल्याने त्यांनी खबरदारी म्हणून कोरोना चाचणी केली आणि त्यावेली दोघांच्याही चाचणीचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला.

पाटील यांनी आपल्या मुलांना नातवाईकांकडे सोपवलं आणि दोघेही एका खासगी रूग्णालयात दाखल झाले. मात्र उपचारादरम्यान सीमा पाटील यांचा मृत्यु झाला. त्यानंतर पत्नीच्या मृत्यूमुळे निराशेच्या गर्तेत गेलेल्या महादेव पाटील यांचाही मृत्यु झाला. कोरोनामुळे पाटील कुटुंबाची वाताहात झाली.

दरम्यान, जेव्हा पाटील आणि त्यांच्या पत्नी रूग्णालयात उपचारासाठी जाताना आपल्या मुलांन, आम्ही लवकर परत येऊ असा शब्द देऊ, असं म्हणून गेले होते मात्र त्यांना तिकडेच कोरोनाने गाठलं. आई-वडिलांच्या जाण्याने मुलांचं मातृ-पितृ छत्र हरपलं.

थोडक्यात बातम्या- 

शिक्षक असलेल्या पतीने पत्नीचा आणि 13 महिन्यांच्या मुलाचा गळा चिरुन केला खून; कारण अत्यंत धक्कादायक

कोरोनाने आई, वडिल आणि भवाचा मृत्यू; घरी न जाता रुग्णांची सेवा करत राहिली महिला डॉक्टर

“मोदी सरकारच्या नियोजन शून्य कारभारामुळे 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील लसीकरण होणार नाही हे दुर्दैव”

महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर लसीकरण सुरू होण्याची शक्यता, पण…- राजेश टोपे

भारतात तयार होणाऱ्या कोरोना लसींचा संपूर्ण साठा सरकार का विकत घेत नाही?- सर्वोच्च न्यायालय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More