बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिवसाढवळ्या झालेल्या गँगवॉरने पुणे हादरलं; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ आला समोर

पिंपरी | पिंपरी शहरातील ओटास्कीम भागात दिवसाढवळ्या झालेल्या गँगवॉरने पिंपरी-चिंचवड पुन्हा एकदा हादरलं आहे. सहा जणांच्या टोळक्‍याने एका तरुणाचा निर्घृण खून केल्याची घटना घडली होती. या घटनेचा बदला घेण्यासाठी म्हणून मंगळवारी दुपारी प्रतिस्पर्धी टोळीने आरोपींच्या मित्रांवर हल्ला केल्याचं कळतंय.

घटनेतील आरोपी सोहेल याला मृत आकाशने ‘काय रे कुठे चाललाय’ असं रागात विचारलं होतं. त्याचा राग मनात धरून तक्रारदार आणि मृत आकाश बोलत थांबलेले असताना सोहेलच्या मित्राने हल्ला चढवत कोयत्याने वार करून आकाशचा खून केला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच या घटनेचे CCTV फुटेज समोर आले आहेत.

या घटनेत मृत झालेल्या आकाश उर्फ मोन्या कांबळेच्या खुनाच्या आरोपावरून सोहेल जाधवसह त्याच्या पाच साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मृत आकाशच्या चिडलेल्या मित्रांनी मारहाण केलेल्या शक्‍तीमान आणि प्रकाश कांबळेला गाठून त्यांच्यावर सिमेंटचे गट्टू आणि लाकडी दांडक्‍याने जबर मारहाण केलीयेे. या दोन्ही घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी नागपूरमध्ये ‘लेडी डॉन’ पिंकी शर्मा हिची हत्या करण्यात आली. चाकूने सपासप वार करुन पिंकीची निर्घृण हत्या करण्यात आली. वादावादीतून दोघांनी पिंकीला संपवल्याचा आरोप आहे. नागपुरात भरदिवसा घडलेल्या हत्याकांडाने एकच खळबळ उडाली होती.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

‘भिक मागा, चोरी करा पण रुग्णांना ऑक्सिजन द्या’; दिल्ली उच्च न्यायालयाने मोदी सरकारला सुनावलं

‘महाराष्ट्राला 500 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा व्हावा’; राजेश टोपे यांची मोदींकडे मोठी मागणी

Remdesivir बनवणाऱ्या कंपन्यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

खळबळजनक! एकाच रूग्णालयातील 384 डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफला कोरोनाची लागण

रसेल,कमिन्सने झोड झोडं झोडलं पण चेन्नईला गोलंदाजांनी तारलं, चेन्नईचा 18 धावांनी विजय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More