बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

6 वर्षीय मुलीच्या ‘या’ व्हिडीओवर शिक्षण विभागाने घेतली दखल, बदलली ऑनलाईन क्लासची वेळ

नवी दिल्ली | गेल्या वर्षभरापासून कोरोना रोगाने सगळीकडे थैमान घातलं आहे. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी याच पार्श्वभूमीवर शाळा, कॉलेज ऑनलाईन घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. परंतू, या ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे लहान मुलांना अनेक अडचणी येत आहेत.

खूप जास्त अभ्यासाला वैतागलेल्या काश्मिरच्या एका 6 वर्षाच्या मुलीनं याबाबतच्या तक्रारी संबंधी एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यामध्ये तिने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यामध्ये लक्ष देण्याची विनंती केली होती. त्या चिमुकलीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता.

चिमुकलीच्या या व्हिडीओची दखल थेट जम्मू-काश्मिरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी घेतली आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहिल्यानंतर मनोज सिन्हा यांनी शालेय मुलांवरील दबाव कमी करण्यासाठी शैक्षणिक धोरण बदण्यास सांगितले आहेत. याच संदर्भात मंगळवारी 1 जून रोजी त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं. त्यामध्ये त्यांनी पहिली ते आठवीपर्यंतच्या मुलांच्या दररोजच्या ऑनलाईन क्लासचा टाईमिंग दिड तास करण्यास सांगितला आहे. हे क्लास दोन टप्प्यात होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

तसेच नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लास तीन तासांच्या वर होणार नसल्याचंही मनोज सिन्हा यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितलं आहे. दरम्यान, त्या चिमुकलीने व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये सांगितलं की, आमचा ऑनलाईन क्लास सकाळी 10 वाजता सुरू होतो आणि दुपारी 2 वाजता संपतो. यात आम्हाला इंग्रजी, गणित, उर्दू आणि ईव्हीएसचे क्लास होतात. यावर तिने मोदीजी लहान मुलांना एवढं काम का करावं लागतंय?, असा सवालही उपस्थित केला होता.

थोडक्यात बातम्या-

काय सांगता ! घाटी रूग्णालयात ICU मधील ‘या’ उपकरणाचा कोरोना अहवाल आला पॉझिटिव्ह

“फडणवीसांची वेदना मी समजू शकतो, त्यांना वाटतं माझ्यामुळे त्यांची सत्ता गेली”

भाजपमध्ये गेलेले आमदार स्वगृही जातील या भीतीनं भाजपचा एककलमी कार्यक्रम – नवाब मलिक

लग्नात नवरा पोहोचला दारुच्या नशेत, हार घालताना समोर पत्नी दिसलीच नाही अन्…

साताऱ्यात 8 वर्षीय मुलीला चालत्या ट्रेनमधून दिलं फेकून, कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

दुर्दैवी! लोककलावंत कांताबाई सातारकरांस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More