बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारतीय पुरूष हाॅकी संघाचं स्वप्न भंगलं; सेमीफायनलमध्ये बेल्जियमकडून भारताचा पराभव

टोकियो | भारतीय पुरूष हाॅकी संघाने तब्बल 49 वर्षानंतर ऑलिम्पिक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली होती. रविवारी झालेल्या रोमांचक सामन्यात भारताने ब्रिटनच्या संघाचा दारूण पराभव केला होता. भारतीय संघाने ब्रिटनच्या तगड्या संघाला 3-1 ने नमवलं होतं. त्यानंतर आज झालेल्या उपांत्य सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. त्यामुळे आता भारतीय पुरूष हाॅकी संघाचं स्वप्न भंगलं आहे.

टोकियो ऑलिम्पिकच्या उपांत्यफेरी स्पर्धेत भारत आणि बेल्जियम यांच्यात सामना रंगला. सुरूवातीपासून दोन्ही संघाने आक्रमक खेळी केली. त्यामुळे सुरूवातीपासूनच सामना अटीतटीचा होणार, असं चित्र दिसत होतं. पहिल्या सत्रात भारताने दमदार खेळी केली. सामन्याच्या दुसऱ्या मिनिटालाच बेल्जियम संघाला पेनल्टी काॅर्नर मिळाला. याचा फायदा उचलत बेल्जियमने पहिला गोल केला. त्यानंतर भारताने देखील आक्रमक खेळी केली.

सामन्याच्या सातव्या मिनिटाला भारताला देखील पेनल्टी काॅर्नर मिळाला. त्याचा फायदा घेत भारताच्या हरमनप्रितने शानदार ड्रॅग फ्लिक करत पहिला गोल केला. त्यानंतर सामन्याच्या आठव्या मिनिटाला मनदीप सिंगने रिव्हर्स स्विप करत भारताला आणखी एक गोल करून दिला. त्यामुळे भारत 2-1 ने आघाडीवर होता. त्यानंतर बेल्जियमने आणखी एक करत पहिल्या सत्रात 2-2 अशी बरोबरी केली.

दरम्यान, दुसऱ्या सत्रात भारताला एकही गोल करता आला नाही. दुसऱ्या सत्रात बेल्जियमने सामन्यावर पुर्ण वर्चस्व ठेवलं. या सत्रात बेल्जियमने 3 गोल दागले. परंतु, भारताला दुसऱ्या सत्रात गोल करता आला नाही. त्यामुळे भारतीय संघ सेमीफायनलमध्ये जिंकू शकला नाही. अखेर काही मिनिटात भारतीय संघ पुर्ण ताकदीने खेळला खेळला. पण अखेरच्या 6 सेकंदात बेल्जियमने आणखी एक गोल करत भारतीय स्वप्न धूळीस मिळवलं.

थोडक्यात बातम्या-

लाईव्ह सेशनमध्ये अभिनेत्रीला न्यूड पाहून चाहत्यांना बसला धक्का, पाहा व्हिडीओ!

भारताला मिळाला ‘हा’ मोठा मान; पंतप्रधान नरेंद्र मोदी रचणार इतिहास

“मोदीजींच्या राज्यात खासदार पण महागाईमुळे गॅस ऐवजी चूल वापरायला लागलेत”

पुण्यातील गणेशोत्सवाची नियमावली जाहीर; वाचा काय आहेत नियम

पुणे ग्रामीणमध्ये डेल्टा प्लसचा शिरकाव; नवे बाधित रूग्ण आढळुन आल्याने एकच खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More