बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी : 100 कोटी प्रकरणात आता ‘ईडी’ची एन्ट्री?

मुंबई | सध्या राज्यात परमबीर सिंग यांच्या लेटर बाॅम्बमुळे राजकारण तापलं आहे. यामध्ये मनसुख हिरेन मृत्यु प्रकरणाचा तपास एटीएस करत आहे. तर मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या बाॅम्बने भरलेल्या गाडीचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयए करत आहे. तर आता एनआयएनंतर या सर्व प्रकरणात ईडीची एंट्री होऊ शकते.

परमबीर सिंग यांनी केलेल्या 100 कोटीच्या आरोपाखाली सक्तवसूली संचालय म्हणजेच ईडी तपास हाती घेऊ शकते. ही रक्कम मोठी असल्याने सक्तवसूली संचालय स्वतःहून या प्रकरणाची चौकशी करणार असल्याची माहिती समोर येत आहे. ईडी या सर्व प्रकरणावर लक्ष ठेऊन आहे. ईडी अनिल देशमुख यांच्या दाव्यातील तथ्य तपासत असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे असं झाल्यास गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत भर पडू शकते.

अनिल देशमुख यांनी सचिन वाझे आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांना बार आणि रेस्टाॅरंटन मधून 100 कोटी जमा करण्याचे टार्गेट दिलं होतं, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी एका पत्रातून केला होता. त्यानंतर अनिल देशमुख यांनी हे आरोप फेटाळून लावले होते. त्यानंतर विरोधकांकडून त्याच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.

दरम्यान, एटीएसकडून आज मनसुख हिरेन यांच्या मृत्युप्रकरणाचा उलगडा होणार आहे. एटीएसकडून आज पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुपारी 4 वाजता महत्वाची बैठक बोलावली आहे. या प्रकरणासंदर्भात या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. तर गृहखात्याचे महत्वाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित असतील.

थोडक्यात बातम्या-

“कारवाई न करण्यासाठी 50 लाख तर नोकरीत परत घेण्यासाठी 2 कोटी”; परमबीर सिंग अडचणीत

शरद पवारांनी नाव घेतलेले ज्युलिओ रिबेरो म्हणतात, “हे काम मी करणार नाही!”

“जो न्याय शिवसेनेच्या मंत्र्याला लावला तो न्याय राष्ट्रवादीच्या मंत्र्याला लावणार का?”

दीदी, हवं तर मला लाथा मारा पण…- पंतप्रधान नरेंद्र मोदी

“चार कोंबड्या, दोन कावळे मेले तरी केंद्र सरकार महाराष्ट्रात सीबीआय आणि एनआयएला पाठवेल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More