बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजपचं टेन्शन वाढलं! उत्तर प्रदेशात प्रियंका गांधी काँग्रेसचा चेहरा

लखनऊ | आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीवरून उत्तर प्रदेशमध्ये राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदार संघात काँग्रेसचा पाय रोवताना दिसत आहे. त्यातच आता उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत प्रियंका गांधीचं काँग्रेस पक्षाचा चेहरा असतील, असं काँग्रेस प्रचार समितीचे प्रमुख पी. एल. पुनिया यांनी सांगितलं आहे.

पी. एल. पुनिया यांनी म्हटलं आहे की, प्रियंका गांधी या उत्तर प्रदेशमध्ये सध्या सर्वाधिक लोकप्रिय नेत्या आहेत. तसेच निवडणुकीपुर्वी उमेदवार जाहिर करण्याची प्रथा काँग्रेसची नाही. असं जरी असलं तरी उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजपच्या विरोधात प्रियंका गांधी सारखा लोकप्रिय चेहरा असल्याचं पी. एल. पुनिया यांनी सांगितलं.

यावेळी पी. एल. पुनिया यांनी उत्तरप्रदेशच्या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप अशी सरळ लढत होणार असल्याचं म्हटलं आहे. उत्तरप्रदेशमध्ये समाजवादी आणि बहुजन पार्टी मागे पडली आहे, असं त्यांनी सांगितलं. प्रियंका गांधी यांनी लखीमपूर घटनेवेळी मोठा संघर्ष करून यश मिळवलं होत, असंही पी. एल. पुनिया म्हणाले.

दरम्यान, प्रियंका गांधी आमच्यासाठी चोवीस तास उपलब्ध असणाऱ्या नेत्या आहेत. ही पक्षासाठी मोठी जमेची बाजू आहे, असं पी. एल. पुनिया यांनी म्हटलं आहे. समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी स्पर्धेतचं नाहीत असं सध्याच चित्र आहे. किमान आजतरी उत्तर प्रदेशात प्रियंका गांधीसारखा लोकप्रिय नेता नाही, असंही पी. एल. पुनिया म्हणाले आहे. ,

थोडक्यात बातम्या-

पाऊस आणि ईडी राष्ट्रवादीसाठी फायद्याची- सुप्रिया सुळे

जळगावात रंगणार ‘खडसे विरूद्ध खडसे’ सामना; भाजप स्वबळावर लढण्याची शक्यता

‘हाफ चड्डी बदलली, डोळे मारण्याचे दिवस गेले’; युवकांना बोलताना उदयनराजेंनी मारला डोळा; पाहा व्हिडीओ

”ती’ गोष्ट माझ्या कायम स्मरणात राहील’; शरद पवारांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा

दिलासादायक! तब्बल 18 महिन्यानंतर मुंबईत एकही कोरोना मृत्यू नाही; पाहा आजची आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More