बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

घरच्यांनी केलं वेगळं तरी पुर्ण केली प्रेम कहाणी, रेल्वेच्या टाॅयलेटसमोर केलं प्रियकरासोबत लग्न

पाटणा | पाटणा येथील एका तरुणीची प्रेमकथा सध्या प्रचंड चर्चेत आली आहे. संबंधित तरुणीच्या परिवाराने दोघांना वेगळं केलं होतं. मात्र तरीही अखेर तरुणीने आपली प्रेम कहाणी पुर्ण केली. रेल्वेच्या स्वच्छतागृहाबाहेर तरुणीने तिच्या प्रियकरासोबत लग्न गाठ बांधली असून त्यांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

संबंधित घटना ही बिहारच्या सुल्तानगंजमधील भीरखुर्दच्या उधाडीह गावातील आहे. संबंधित तरुणीचं नाव अनु कुमारी असं असून तिच्या प्रियकराचे नाव आशु कुमार असं आहे. आशु आणि अनु गेल्या अनेक वर्षांपासून प्रेमसंबंधांमध्ये आहेत. मात्र ही गोष्ट घरी कळताच अनुच्या परिवाराने दोघांच्याही नात्याला नकार दिला आणि अनुचं लग्न जबरदस्तीने दुसऱ्या मुलासोबत लावून दिलं.

लग्नानंतर अनुने आपल्या पतीसोबत राहण्यास नकार दिला होता. अशातच बुधवारी संधी मिळताच अनु आपल्या प्रियकरासोबत फरार झाली. दोघंही सुल्तानगंज स्टेशनवर पोहोचून बंगळुरुसाठी रवाना झाले आणि याचदरम्यान त्यांनी ट्रेनमध्येच लग्नगाठ बांधली. यावेळी आशुने अनुच्या भांगेत कुंकु भरताना फोटो देखील काढण्यात आला आहे.

दरम्यान, दोघांच्या प्रेमकहाणीची चर्चा तर सर्वत्र रंगली आहेच. मात्र दोघांच्या लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एवढंच नाही तर अनुने आपल्या पतीला सोडून आपल्या प्रियकरासोबत लग्न केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘या’ शहरातील लग्नावरील निर्बंध उद्यापासून हटणार; हॉटेलही पूर्ण क्षमतेने होणार सुरू

आयफोनमधून झाले तरुणीचे न्यूड फोटो सोशल मीडियावर लीक, अ‌ॅपल कंपनी देणार करोडोंची भरपाई

“वाघाच्या मिशीला हात लावायला सुद्धा हिंमत लागते, या मी वाट पाहतोय मग बघू”

“गुलामासारखी वागणूक मिळत होती तर तेव्हा तुमचं तोंड शिवलं होतं का?”

‘शिवबांचे खरे वैचारिक वारसदार असाल तर…’; आरक्षणासाठी नक्षलवाद्यांनी काढलेल्या पत्रकाला संभाजीराजेंचं उत्तर

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More