Top News देश

ट्रॅक्टर परेडमधील शेतकऱ्याला स्टंटबाजी करणं पडलं महागात; पाहा व्हिडीओ

नोएडा | केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं दिल्लीमध्ये गेले 60 दिवस आंदोलन चालू आहे. सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये अनेक बैठका झाल्या मात्र तोडगा निघाला नाही. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आज प्रजासत्ताकदिनानिमित्त आयोजित केलेल्या रॅलीत एक ट्रॅक्टर पलटी झाला आहे.

नोएडामधील चिल्ला सीमेवर आयोजित ट्रॅक्टर परेडआधी काही शेतकरी ट्रॅक्टरमध्ये बसून स्टंट करत होते. हा स्टंट करणं शेतकऱ्याला महागात पडला आहे.

स्टंट करताना  ट्रॅक्टर पलटल्याची दुर्घटना घडली आहे. यामध्ये एक शेतकरी जखमी झाल्याचं कळतंय. शेतकरी बराच वेळ आधी स्टंट करत होता मात्र जाग्यावर ट्रॅक्टर फिरवता फिरवता ट्रॅक्टर पलटी झाला.

दरम्यान, कृषी कायद्यांचा विरोध दर्शवण्यासाठी आज प्रजासत्ताक दिनानिमित्त शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन केलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान उद्घाटनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नागपूर दौऱ्यावर

शेतकरी जनसंवादादरम्यान सिंघू सीमेवर काँग्रेसच्या ‘या’ खासदारावर प्राणघातक हल्ला

सर्वांसाठी लोकल लवकरच होणार सुरु- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पद्मश्रीसाठी संजय राऊतांच्या नावाची ठाकरे सरकारने केली होती शिफारस

हेच का आपलं प्रजासत्ताक? केंद्र सरकारनं एक पाऊल मागं घेतलं असतं तर…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या