बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मन सुन्न करणारी घटना; बापाने मुलीचा मृतदेह खांद्यावर घेऊन पायी चालत स्मशानात नेला, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | कोरोना संसर्गाने हाहाकार माजवला आहे. रुग्णांना रुग्णालय, बेड, ऑक्सिजन आणि औषधांची पूर्तता होत नाहीये. एवढंच नाही तर मृत्यूनंतरही त्यांची फरफट होताना दिसत आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी लोक घाबरत आहेत.

लोकांच्या मनात प्रचंड भीती आहे. त्यामुळे याकाळात कोणाचा मृत्यू झाला तर पार्थिवाला खांदा देण्यासाठी माणसं देखील येत नसल्याचं पहायला मिळतंय. अशीच  काळीज पिळवटून टाकणारी एक घटना पंजाबमधील जलंधरमध्ये घडली आहे.

11 वर्षांच्या मुलीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोणीच तिला खांदा द्यायलाही पुढे आलं नाही. शेवटी बापाने मुलीचा मृतदेह खांद्यावर घेऊन अनेक किलोमीटर पायी चालत स्मशानात पोहोचवला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोणीच मुलीला हात लावायला पुढे आलं नाही. त्यानंतर मीच तिला खांद्यावर घेऊन स्मशानभूमीपर्यंत घेऊन गेलो, असं मुलीच्या वडिलांनी सांगितलं.

सिव्हिल रुग्णालय जलंदरमधून त्यांच्या मुलीला अमृतसर येथे रेफर करण्यात आलं होतं. सुरुवातील रक्ताच्या एका बाटलीसाठी त्यांच्याकडून 4500 रुपये घेण्यात आले होते आणि मुलीच्या निधनानंतर रुग्णवाहिकेच्या नावावर 2500 रुपये आकारण्यात आले. मात्र त्यांना कोणतीही सुविधा देण्यात आली नाही, असं मृत सोनूचे वडील दिलीप कुमार यांनी सांगितलं.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

हृदयद्रावक घटना! 25 दिवसांपूर्वी आई झालेल्या डॉक्टरचा कोरोनानं मृत्यू

“महाविकास आघाडी सरकारने सत्तेत येताच मराठा आरक्षणाचा खून केला”

“कोरोनाची लढाई कठीण आणि भयानक होणार आहे, सज्ज रहा”

‘डोळ्यांदेखत रुग्ण जीव सोडताहेत अन् आम्ही हतबलपणे पाहतोय’; डॉक्टर ढसाढसा रडले, पाहा व्हिडीओ

…अन्यथा तुमच्यावर कारवाई करणार; सलमान खानची कायदेशीर कारवाईची धमकी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More