बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कंगनाच्या ‘धाकड’पेक्षा कार्तिकचा ‘भूल भुलैया 2’ सरस, पहिल्या दिवसाची कमाई आली समोर

मुंबई | कार्तिक आर्यन (Kartik Aryan) व कियारा अडवाणीचा (Kiara Adwani) बहुचर्चित असा ‘भूल भुलैया 2’ व कंगानाचा (Kangana Ranaut) ‘धाकड’ दोन्ही चित्रपट 20 मे रोजी प्रदर्शित झाले. पहिल्याच दिवशी धाकडने भूल भुलैया समोर गुडघे टेकले असून कार्तिकच्या भूल भुलैयाने प्रेक्षकांना भूरळ पाडली आहे.

कार्तिक आर्यन, कियारा अडवाणी व तब्बूच्या भूल भुलैया 2 ने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 5 कोटींची ओपनिंग केली आहे. ‘भूल भुलैया 2’ ने अॅडव्हान्स बुकींगमध्येच साडे तीन कोटींची कमाई केली होती.

हा चित्रपट फार कमाई करेल असा अंदाज वाटत नाही पण अॅडव्हान्स बुकींगचा चित्रपटाला चांगलाच फायदा झाला आहे. तर कंगनाच्या ‘धाकड’ने पहिल्या दिवशी 1.20 कोटींची कमाई केली आहे.

दरम्यान, कंगनाच्या धाकड चित्रपटाची बरीच चर्चा झाली. मात्र, पहिल्या दिवशी धाकडची जादू बॉक्स ऑफिसवर फारशी चालली नसल्याचं पाहायाला मिळत आहे. तर ‘भूल भुलैया 2’ देखील 15 कोटींपर्यंतची कमाई करू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘काँग्रेसची अवस्था आभाळ फाटल्याप्रमाणे, ही भोकं शिवणार कशी?’; शिवसेनेचा प्रहार

सर्वसामान्यांना धक्क्यावर धक्के! सीएनजी पुन्हा महागलं

IANS-C Voter Survey| पंतप्रधान म्हणून आजही मोदींनाच पंसती, राहुल गांधी मात्र…

Corona Update| राज्यातील सर्वाधिक कोरोना रूग्ण मुंबईतच, वाचा आकडेवारी

राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना आवाहन, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More