बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चिंताजनक! ब्लॅक फंगसपेक्षाही धोकादायक असलेल्या ‘येलो फंगस’ चा पहिला रूग्ण सापडला!

लखनऊ | म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी या आजाराने देशासह राज्यात शिरकाव केला आहे. अशात आता ब्लॅक फंगसपेक्षाही धोकादायक असलेल्या येलो फंगसचा पहिला रुग्ण उत्तर प्रदेशात सापडला आहे. ब्लॅक फंगस आणि व्हाईट फंगसपेक्षा येलो फंगस अधिक धोकादायक आणि खतरनाक असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

येलो फंगस आढळून आलेला रुग्ण गाझियाबादचा राहणारा आहे. 34 वर्षाच्या या तरुणाला आधी कोरोनाची लागण झाली होती. तसेच त्याला मधुमेहाचाही त्रास आहे. ईएनटी सर्जन डॉक्टर बृज पाल त्यागी त्याच्यावर उपचार करत आहेत.

हा आजार अत्यंत गंभीर आणि धोकादायक आहे. भूक न लागणे, वजन कमी होणे आणि सुस्ती येणे आदी लक्षणे जाणवल्यास तात्काळ डॉक्टरांकडे जाऊन उपचार करून घ्या. सध्या तरी या आजारावर amphoteracin b हे इंजेक्शन उपयुक्त आहे. हे इंजेक्शन ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीफंगल आहे, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

हा फंगस जसजसा वाढतो, तसतसा अधिक घातक होतो. या फंगसची लागण झालेली असल्यास आणि अंगावर जखम असल्यास त्यातून पाण्याचा स्त्राव होतो. तसेच या फंगसची लागण झालेल्यांची जखम अत्यंत धीम्यागतीने बरी होते. आधीच कोरोनाचं संकट असताना त्यात ब्लॅक फंगसच्या आजाराने विळखा घातला. त्यानंतर लगेच व्हाईट फंगसनेही थैमान घातलं. आता येलो फंगसचा रूग्ण सापडल्याने चिंतेत आणखी भर पडली आहे.

थोडक्यात बातम्या- 

1 जूननंतर महाराष्ट्रातील एवढे जिल्हे वगळून लॉकडाऊन उघडणार?; या मंत्र्याचं सूचक वक्तव्य

मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजेंची महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात; आज ‘या’ ठिकाणी देणार भेट

‘तेरी मिट्टी में मिल जावां…’; कोरोना योद्ध्यांसाठी जवानाने वाजवली मनमोहक धून, पाहा व्हिडीओ

ब्राह्मण समाजातील एक वर्ग मोठ्या प्रमाणात गरीब, म्हणून भाजपने… – चंद्रकांत पाटील

अल्पवयीन मुलीवर दोन महिने बलात्कार; पीडिता गरोदर राहिल्यानंतर समोर आला धक्कादायक प्रकार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More