बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ओमिक्रॉननंतर आता ‘या’ नवीन विषाणूची दहशत, ‘या’ ठिकाणी सापडला पहिला रुग्ण

नवी दिल्ली | कोरोनाचा नवा व्हेरीयंट ओमिक्रॉनने (Omicron) सर्व देशाची चिंता वाढवली आहे. त्यात कोरोना विषाणूनेही पुन्हा डोकं वर काढलं आहे. कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. अशा परिस्थितीत आता इस्त्राइलमधून (Israel) एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. इस्त्राइलमध्ये एका नव्या विषाणूचा रुग्ण सापडला आहे.

इस्त्राइलमध्ये आता फ्लोरोना (Florona) या नव्या विषाणूचा पहिला रुग्ण सापडला आहे. त्यामुळे आता इस्त्राइलसह जगभरात खळबळ माजली आहे. सध्या फ्लोरोना विषाणूबद्दल संशोधन सुरु आहे. मात्र, फ्लोरोना हा कोरोना आणि इन्फ्लुएंजा यांचा दुहेरी संसर्ग आहे, असं वृत्त एएनआयने दिलं आहे.

इस्त्राइलमध्ये सध्या कोरोनाची पाचवी लाट आलेली आहे. इस्त्राइलमध्ये कोरोना वेगाने पसरत आहे. त्यामुळे इस्त्राइल सरकारने लसीकरणाचा वेग वाढवला आहे, अशी माहिती इस्त्राइलचे आरोग्यमंत्री नित्जन होरोविट्ज यांनी दिली आहे. अशात या नवीन आलेल्या विषाणूने इस्त्राइलची चिंता वाढवली आहे.

दरम्यान, भारतात सध्या कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. भारतात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे आता प्रशासनाने त्या दृष्टीने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. देशात सध्या ओमिक्रॉन व्हेरीयंटनेही प्रवेश केला आहे. त्यामुळे सध्या नागरिक चिंतेत आहेत.

थोडक्यात बातम्या-

‘ही लक्षणं दिसली तरी…’; केंद्राच्या राज्यांना सूचना

“त्याच्या छाताडावर उभं राहून…”, मुख्यमंत्र्यांनी दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा

31st निमित्त पुण्यातील वाहतूकीत बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते बंद राहणार

“तू आम्हाला टेन्शनमध्ये पाठवलं, मी अंघोळ करता करता…”

सोनम कपूरची सुधीर मुनगंटीवार यांच्यावर घणाघाती टीका, म्हणाली…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More