बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

UPSC Result | मराठवाड्याच्या विनायक महामुनीने देशात मिळवला 95 वा क्रमांक

लातूर | केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालात महाराष्ट्रातील 100 हून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. देशातील सर्वात अवघड समजल्या जाणाऱ्या या परिक्षेत राज्यातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलं आहे. यात लातूरच्या 5 विद्यार्थ्यांनी यश मिळवलं आहे.

लातूरच्या विनायक महामुनी या विद्यार्थ्यांनं देशात 95 वा क्रमांक मिळवला आहे. लातूरमधून पास झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये महामुनी प्रथम क्रमांकावर आहे. विनायक महामुनी हा लातूरचा रहवाशी प्रकाशराव महमुनी यांचा मुलगा आहे.

लातुरच्या शिरपेचात आता आणखी एक मानाचा तुरा रोवण्याचं काम महामुनी याने केलं आहे. राज्यभरातून विनायकला त्याच्या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या जात आहेत. विनायक हा लातूरच्या प्रसिद्ध दयानंद विज्ञान महाविद्यालयाचा विदयार्थी आहे. त्याच्यावर लातूरातच शैक्षणीक संस्कार झाले आहेत.

लातूरात शिक्षण झाल्यानंतर युपीएससीची तयारी करण्यास विनायक याने सुरूवात केली. लातूरच्या श्री केशवराज विद्यालयातून विनायक आपलं लहानपणीचं शिक्षण पुर्ण केलं आहे. राज्यासह लातूरमधून विनायकच्या यशाबद्द्ल त्याचं कौतुक होत आहे.

थोडक्यात बातम्या 

आई-वडिलांच्या कष्टाचं केलं चीज; शेतकऱ्याची लेक बनली IAS

पुण्यातील ‘या’ भागाला मोठा दिलासा, बहुमजली उड्डाणपुलाचं भूमिपूजन संपन्न

UPSC Result | लातूरच्या पूजा कदमने अंधत्वावर मात करत युपीएससीत मिळवलं यश

मुंबई विमानतळावर ‘इतके’ हजार प्रवासी आढळले कोरोना पॉझिटिव्ह

परिवहनमंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ; ईडीने पुन्हा एकदा समन्स बजावलं

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More