बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पंढरपुर विधानसभा मतदारसंघाचं भवितव्य आज ठरणार; चुरशीच्या लढतीत कोण होणार विजयी?

सोलापूर | राष्ट्रवादीचे नेते व दिवंगत आमदार भारत भालके यांचे निधन झाल्यानंतर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील जागा रिक्त झाली आणि त्यानंतर पंढरपुरात पोटनिवडणुकीचं वारं वाहू लागलं. यातच उमेदवारी कोणाला मिळणार यावरून चांगलंच रण पेटलं होतं. त्यात राष्ट्रवादीकडून भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली तर भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली.

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी दुहेरी आणि चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. त्यातच आज या मतदारसंघातील उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे. कारण आज विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल घोषित केला जाणार आहे.

निकाल ऐकण्यासाठी नागरिकांनी गर्दी करू नये, असं आवाहन प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात आलं आहे. तसेच कोरोना पार्श्वभूमीवर जमावबंदीचा आदेशही लागू असल्याने नागरिकांना घराबाहेर पडून निकाल ऐकता येणार नाही. त्या ऐवजी घरात बसून आकाशवाणी किंवा वोटर हेल्पलाइन ॲपचा वापर करून निकाल जाणून घेण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे.

कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये पंढरपूर येथे पोस्टल मतांची मोजणी सुरू झालेली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना तसेच उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा जल्लोष करण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत निकाल स्पष्ट होईल, अशी शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आता या निकालानंतर नेमकी आमदारकीसाठी कोणाची वर्णी लागणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या –

“ममता जिंकल्यास तो मोदी-शहांचा व्यक्तिगत पराभव ठरेल”

#सकारात्मक_बातमी! एकाच कुटुंबातील 11 जणांना कोरोना; अशी केली सर्वांनी कोरोनावर मात

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरुच; रुग्णांसह मृतांची संख्याही लक्षणीय

22 वर्षीय तरुणीची बर्थडेलाच हत्या, सेक्स करताना…. आरोपीचा धक्कादायक दावा

दिलासादायक! मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत घट; जाणुन घ्या आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More