बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कौतुकास्पद! मुलगी झाली म्हणून पाणीपुरी विक्रेत्यानं वाटली ‘इतक्या’ हजार लोकांना मोफत पाणीपुरी

नवी दिल्ली |  पहिल्या काळात मुलगी झाली तर घरातील मुलंच नाक मुरडायचीत, कारण त्यांनी वंशाला दिवा म्हणजेच मुलगाच हवा असायाचा. मात्र आता काळानुसार लोकांची माणसिकता बदलताना दिसत आहे. कारण आता मुलगी झाली तर लोकांनी मुलगा झाल्यापेक्षा जास्त आनंद झाल्याचं आपण पाहायला मिळतं. अशाच प्रकारे भोपाळमधील एका पाणी-पुरी विक्रेत्याने मुलगी झाल्याच्या आनंदात मोठा जल्लोष केला आहे.

भोपाळमधील आंचल गुप्ता कोलार मार्गावर रहिवासी आहे. आंचल हे पाणी-पुरीचा व्यवसाय करतात. 17 ऑगस्ट रोजी आंचल यांच्या घरी एका मुलीने जन्म घेतला. मुलीच्या जन्माचा आंचल यांना प्रचंड आनंद झाला असून आपला आनंद साजरा करण्यासाठी त्यांनी जवळजवळ 50 हजार लोकांना मोफत पाणीपुरी वाटली.

आंचल यांना मुलगी होण्याआधी एक मुलगा देखील आहे. नुकत्याच जन्मलेल्या मुलीचं नाव ‘अनोखी’ असं ठेवलं आहे. आंचल यांच्या दुकानाच्या बाहेर रांगा देखील लावल्या होत्या. पाणीपुरीचं मोफत वाटप करण्यासाठी त्यांनी दुकानाबाहेर खास मांडव टाकला होता आणि दहा स्टाॅल लावले होते.

दरमायन, काळ पुढे गेला असला तरी अनेकांना मुली नकोशा असतात मात्र एका पाणीपुरी विक्रेत्यानं मुलगी झाल्यावर साजरा केे करणं हे अत्यंत कौतुकास्पद आहे. तसेच आंचल यांचं देशभर कौतुक करण्यात येत आाहे. गरीब परिस्थिती असताना देखील आपल्या मुलीच्या जन्माचा असा जल्लोष साजरा केल्यानं सर्वांनीच त्यांचं कौतुक केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील वाढीव पदांवरील शिक्षकांचे वाढीव पदांच्या मंजुरीसाठी बेमुदत उपोषणहवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ भागात अलर्ट जारी!

बीएससी नर्सिंगच्या अभ्यासक्रमात ‘हे’ मोठे बदल, आयएनसीने केली मोठी घोषणा

रणवीर-दीपिका झाले गुंठामंत्री! मुंबईमध्ये खरेदी केली तब्बल ‘इतक्या’ कोटींची जमीन

”ही’ गोष्ट करून मोदींनी दाखवून दिलं, ‘मी कोणाचा नाही, माझे कोणी नाही’”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More