बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुलीने घरमालकाच्या मुलाला भाऊ मानून बांधली राखी, त्याच भावाने मित्रासोबत मिळून केला गँगरेप

भोपाळ | मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर येथे एक अत्यंत धक्कादायक प्रकार घडला असल्याचं समोर आलं आहे. या घटनेमध्ये 12 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. या घटनेनंतर संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित मुलगी आरोपीला आपला भाऊ मानत असायची. एवढंच नाही तर त्याला राखी देखील बांधत असत.

ग्वाल्हेरमधील ‘चार शहर का नाका’ या भागात संबंधित मुलगी भाड्याच्या घरात राहत होती. घरमालकाच्या मुलाला संबंधित मुलगी आपला भाऊ मानून त्याला राखी देखील बांधत असे. मात्र गेल्या आठवड्यात ती आपल्या घरातून बाहेर येताच दोन्ही आरोपींनी तिचं तोंड दाबून तिला आपल्या खोलीत नेलं. आरोपींपैकी मुख्य आरोपी घरमालकाच्या मुलाचं नाव नीलू असं असून त्याच्या आरोपी मित्राचं नाव सत्यम असं आहे.

मुलीला आपल्या खोलीत नेऊन तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर निलूने तिच्यावर बलात्कार केला. यावरच न थांबता निलूचा मित्र सत्यमने देखील तिच्यावर बलात्कार केला. यादरम्यान, मुलगी दादा-दादा अशी विनवणी करत होती. मात्र या दादांना तिच्यावर मात्र दया आली नाही. काही वेळातच शेजारील लोकांना जाग आली. अशातच मुलीने आरोपींना धक्का देऊन तिथून पळ काढला.

दरम्यान, घरी येऊन मुलीने आपल्या सोबत झालेली हकीकत सांगितली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच आरोपी फरार होण्याआधी त्यांना अटक करण्यात आली. एवढंच नाही तर दोन्ही आरोपींवर पाॅक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाऊ मानणाऱ्या बहिणीलाच या नराधमाने शिकार बनवल्याने सर्वत्र एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.

थोडक्यात बातम्या-

मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकांवर पोलिसांची कारवाई; अँटीजन चाचणीनंतर धक्कादायक माहिती समोर

गोबर, गोमूत्र आणि रामदेव ही थेरपी बंद करा- नवाब मलिक

दिलासादायक! महाराष्ट्रातील ‘या’ शहरात कोरोनामुक्तीचा दर 93 टक्यांवर, सक्रिय रूग्णसंख्याही घटली

विवाहीत गर्लफ्रेंडसोबत तरुणाची आत्महत्या, धक्कादायक कारण आलं समोर

चिमुकल्याला झोप यावी म्हणून डॉक्टरांनी गायलं सुंदर गाणं; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More