लोकल प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, आता लवकरच ‘ही’ सुविधा मिळणार
मुंबई | लोकलने ट्रेनने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबई उपनगरीय रेल्वे वातानुकूलित करण्याचा प्रस्ताव केंद्राला देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तर या प्रस्तावाला केंद्रातून मंजूरी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई उपनगरीय रेल्वे एसी करण्याच्या 20 हजार कोटी रूपयांच्या प्रकल्पाला प्राधान्य द्या असे आदेश पीएमओ कडून देण्यात आले आहे. तर यासाठी केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून देखील मंजूरी मिळण्याची शक्यता आहे.
राज्यात गेले काही दिवस अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यातच पालिकेच्या निवडणुका आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर लोकलचा निर्णय घेण्यात आला. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक कामांना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, फक्त मुंबई नव्हे तर मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली या ठिकाणीही पालिकेच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे मुंबईच्या आसपासच्या परिसरातील नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
थोडक्यात बातम्या
‘घटनेचे रखवालदार म्हणवून घेणारेच असे दुटप्पीपणे वागत असतील तर…’, शिवसेनेचा घणाघात
मोठी बातमी! शिवसेनेला आणखी एक धक्का, शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदेच
शरद पवारांचं मोठं वक्तव्य, राजकीय वर्तुळात खळबळ
“फडणवीस मुख्यमंत्री झाले नाहीत म्हणून गिरीश महाजन अजूनही फेट्याने डोळे पुसतायेत”
Comments are closed.