पुणे | पुणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नका सॅनिटायझरचा वापर करा. असं आवाहन प्रशासनातर्फे नागरिकांना वारंवार करण्यात येत आहे. मात्र काही नागरिक बेजबाबदारपणे वागून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवण्यास मदत करत आहेत. पुण्यात कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढत असल्याचं चित्र आहे. आजची कोरोना रुग्णांची आकडेवारी धक्कादायक आहे.
पुण्यामध्ये आज दिवसभरात 2 हजार 574 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 2 हजार 771 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 32 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे. तर 8 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत.
पुण्यात सध्या 674 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 2,61,659 इतकी आहे. तर पुण्यात 32 हजार 875 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 5 हजार 243 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 2,23,541 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 15 हजार 153 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे पण तरीही कोरोना रूग्णांची संख्या आटोक्यात येत नसल्याचं पाहायला मिळत आहे.
थोडक्यात बातम्या –
शेकाप आमदार जयंत पाटील यांना लस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण
भारत नानांवर प्रेम करणारी जनता भगीरथ भालके यांना विजयी करणारच- सुप्रिया सुळे
शेकाप आमदार जयंत पाटील यांना लस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण
मोदींच्या बांग्लादेश दौऱ्यानंतर शेख हसीनांची ‘ती’ साडी चर्चेत; जाणून घ्या कारण
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानंतर बांगलादेशमधील वातावरण खवळलं
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.