बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना संकटात भारताला ‘या’ जवळच्या मित्रदेशाने दिला मदतीचा हात, करणार ही मोठी मदत

नवी दिल्ली |  कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने देभरात थैमान घातलेलं आहे. भारतात कोरोनाची लस उपलब्ध झाल्यावर भारताने ती इतर देशांना पुरवत त्यांना मदत केली होती. मात्र आता भारतातीलच परिस्थिती गंभीर आहे. कोरोना लसींचा डोसही अपुरा आहे. अशातच ईस्रायलने भारताला या संकटात मदतीचा हात पुढे केला आहे. इस्रायलचे परराष्ट्रमंत्री गाबी अश्केन यांनी याबाबत माहिती दिली आहे.

भारत आणि ईस्रायल यांच्यात अनेक प्रकारचे राजकीय, संरक्षण आणि आर्थिक स्वरुपाचे करार आहेत. या कठीण काळात आम्ही पूर्णपणे भारतासोबत उभे आहोत. आम्ही आमच्या भारतीय भाऊ आणि बहिणींसाठी लाइफ सेव्हिंग उपकरणे पाठवत आहोत, असं गाबी अश्केन यांनी म्हटलं आहे.

या उपकरणांत ऑक्सिजन जनरेटर्स आणि रेस्पेरेटर्रसचा समावेश आहे. ही सर्व उपकरणे विमानाच्या साहाय्याने भारतात पाठवली जाणारा आहेत. या मदतीच्या कार्यात इस्रायलमधील मुख्य आर्थिक संस्था, जसे ईस्रायल-भारत चेम्बर ऑफ कॉमर्स, ईस्रायल-एशिया चेम्बर ऑफ कॉमर्स, मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ ईस्रायल, फेड्रेशन ऑफ ईस्रायल चेम्बर्स ऑफ कॉमर्स यांचे मदतीसाठी अश्केन यांनी आभार मानले आहेत.

दरम्यान, भारताने कोरोनाच्या पहिल्या लाटेत ईस्रायलला मदत केली होती. भारताचा सर्वात जुना मित्रदेश रशियानेसुद्धा भारताला मोठी मदत केली आहे. रशियाने कोरोना रुग्णांसाठी मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन, 75 व्हेंटिलेटर, 150 बेड साइड मॉनिटर आणि फॅबिपिराविर औषध पाठवलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

लस घेताना पोरीची नाटकं पाहून डॉक्टर जाम भडकले, व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

कोरोनाकाळात यशराज फिल्म्सचा मदतीचा हात, ‘या’ 30 हजार लोकांसाठी मोफत लसीकरणाचा निर्णय

“लोकशाही संपली असं जाहीर करा नाहीतर चंद्रकांत पाटील यांनी न्यायालयाची माफी मागावी”

कोरोनाचे उपचार घेताना ‘हे’ औषध घेतलं तर झपाट्याने पसरेल कोरोना; एम्स संचालकांचा इशारा

…म्हणून कंगणा राणावतला कोसळलं रडू, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More