बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

41 वर्षांनंतर हाॅकी संघानं रचला इतिहास; रोमांचक सामन्यात भारताचा दणदणीत विजय

मुंबई | भारतीय संघाने ब्रिटनच्या तगड्या ब्रिटन संघाला 3-1 ने नमवत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता. मात्र त्यानंतर झालेल्या सेमीफायनल सामन्यात भारतीय पुरूष हाॅकी संघाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे आता भारतीय पुरूष हाॅकी संघाचं सुवर्णपदकाचं स्वप्न भंगलं होतं. मात्र आता कांस्यपदकासाठी झालेल्या सामन्यात भारताने जर्मनीला धूळ चारत दणदणीत विजय मिळवला आहे.

भारत आणि जर्मनी यांच्यात झालेल्या रोमांचक सामन्यात भारताने 5-4 असा दणदणीत विजय मिळवला आहे. सामन्याच्या सुरूवातीपासून दोन्ही संघाने आक्रमक खेळी केली. सामन्याच्या 15 व्या मिनिटाला जर्मनीने गोल केला आणि जर्मनीला आघाडी मिळवून दिली. त्यानंतरच 17 व्या मिनिटाला सिमरनजीतने गोल करत भारताला बरोबरीवर आणलं. त्यानंतर 24 व्या मिनिटाला जर्मनीच्या नेकलास वेलेनने गोल दागत 2-1 असा स्कोर केला.

पुढच्याच मिनिटाला जर्मनीने आणखी एख गोल दागत 3-1 अशी आघाडी मिळवली. त्यानंतर भारताच्या चिंता वाढल्या. पेनल्टी काॅर्नरचा पुरेपूर फायदा घेत हार्दिक सिंगने आणखी एक गोल करत भारताच्या आशा उंचावल्या. हाफ टाईमला केवळ काही सेकंद बाकी असताना हरमनप्रितने भारतासाठी आणखी एक गोल केला आणि सामना 3-3 अशा बरोबरीवर नेला.

दरम्यान, दुसऱ्या सत्रात रूपेंद्रपालने आणखी एक गोल करत भारताला 4-3 अशी आघाडी मिळवून दिली. तर सिमरणजीतने आणखी एक शानदार गोल करत भारताला 5-4 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर जर्मनीने आणखी एक गोल दागत सामन्यात चुरस निर्माण केली. अखेरच्या क्षणापर्यंत झालेल्या सामन्यात भारताने अखेर विजय मिळवला आहे. तब्बल 41 वर्षीनंतर भारताला हाॅकीमध्ये पदक मिळालं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘या’ विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या नाकात 1000 पटीनं अधिक व्हायरस, संशोधनातून नवी माहिती समोर

“मनसे असो वा राष्ट्रवादी, भाजप युती करणारच नाही”

“संसदेतील गोंधळाचं खापर विरोधकांवर फोडून तुमच्या त्या लोकशाहीचं श्राद्धच घाला”

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारीअशोक चव्हाण आणि महाविकास आघाडीचं ‘नाचता येईना अंगण वाकडं’- प्रविण दरेकर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More