बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

11 हजारांसाठी रुग्णालयाने ठेवून घेतलं महिलेचं मंगळसूत्र; माणुसकीला काळीमा फासणारी घटना

बुलडाणा | बुलडाण्याच्या खामगावमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोरोना महामारीच्या काळामध्ये अनेक खाजगी रुग्णालये रुग्णांची लूटमार करत असल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या आहेत. तसेच काही ठिकाणी रुग्णालयांमध्ये भरण्यास पैसे नसल्याने मृतदेह देखील नातेवाईकांना देण्यात आलेले नाहीत.

बुलडाण्यामधील खामगाव येथील एका खाजगी रुग्णालयाने बिलामध्ये अवघे 11 हजार रुपये कमी पडत असल्याने रुग्णाच्या पत्नीचं थेट मंगळसूत्र ठेवून घेतल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे.

खामगावमधील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाच्या बायकोने उपचाराच्या खर्चासाठी आपले कानातले गहाण ठेवून 23 हजार रुपयांची सोय केली होती व आता त्यांच्या पतीला रुग्णालयातून सुटी मिळणार होती. रुग्णालयाने रुग्णाला डिस्चार्ज देण्यापूर्वी त्यांचा संपूर्ण हिशोब केला असता 11 हजार रुपये आणखी द्यायचे बाकी असल्याचं सांगितलं.

पत्नीने पैसे नसल्याचं बोलून दाखवलं. पण रुग्णालय प्रशासनाने त्यांना धमकावत पूर्ण पैसे भरल्याशिवाय रुग्णाला आम्ही सोडणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने संबंधित रुग्णाच्या पत्नीचं मंगळसूत्र मागितलं व रुग्णाला घेऊन जायचं असल्यास मंगळसूत्र जमा करावं लागेल, असं सांगितलं. नाईलाजाने त्या हतबल पत्नीने आपलं मंगळसूत्र रूग्णालयात जमा केलं आणि आपल्या पतीला घेऊन घरी परतली. अशा अमानवी कृत्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. तसेच खामगावमधील संबंधित खाजगी रुग्णालयावर तात्काळ कारवाई करावी, अशी देखील मागणी सामान्यातून केली जात आहे.

थोडक्यात बातम्या –

पुण्यातील नव्या कोरोना रूग्णसंख्येत लक्षणीय घट; कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक

क्रिकेटप्रेमींसाठी खूशखबर! आयपीएलचे सामने आता ‘या’ देशात खेळले जाणार; BCCI करणार घोषणा?

कुटुंबीयांनी प्रेमविवाहाला नकार दिल्याने पुण्यातील प्रेमीयुगुलाने उचललं ‘हे’ धक्कादायक पाऊल

औरंगाबादमध्ये शेतकरी कुटुंबाला मारहाण; गुन्हा दाखल करण्यास पोलिसांची टाळाटाळ, पाहा व्हिडिओ

साखरपुडा एकीसोबत, लग्न दुसरीसोबत; जालन्यातील घटनेनं एकच खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More