खेळ

ICC म्हणतंय, “स्टंपच्या मागे धोनी असताना क्रिज सोडायचं नसतं!”

दिल्ली | आयसीसीने फलंदाजांना एक प्रकारे सावध करणारं ट्विट केलं आहे. ट्विटमध्ये म्हटलं आहे की, धोनी स्टंपच्या मागे असताना क्रीज सोडायचं नसतं, असं मजेदार ट्विट आयसीसीने केलं आहे.

विशेष म्हणजे आयुष्य सुंदर होण्यासाठी काय केलं पाहिजे असा प्रश्न करणाऱ्या एका ट्विटला रिट्विट करताना आयसीसीनं असं म्हटलं आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात धोनीच्या थ्रोवर भारताच्या विजयात अडसर बनलेल्या  निशामला धोनीने धावबाद केलं. जर नीशाम बाद झाला नसता तर कदाचित सामन्याचा निकाल वेगळा असता.

दरम्यान, पायचिताचे अपिल फेटाळून लावले तेव्हा चेंडू कुठे आहे हे न पाहताच निशामने चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा धोनीने चपळाई दाखवत अचूक फेकीवर त्याला धावबाद केलं आणि भारताचा विजयाचा मार्ग मोकळा केला.

महत्वाच्या बातम्या-

-“या देशात ‘एक’ पंतप्रधान होते पण ते मुके होते”

पंतप्रधान मोदींविरोधात राज ठाकरेंचा ममता बॅनर्जींंना पाठिंबा

-कुत्रा-मांजर नव्हे, जंगलाचे राजे आहेत नरेंद्र मोदी- देवेंद्र फडणवीस

ट्रॅकच्या मधोमध थांबले अन् लोकलला साडी अडकल्यानं 3 जीव गेले

-बळीराजाच्या पोरींचं पुणतांब्यात आंदोलन, आजपासून करणार अन्नत्याग

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या