बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आयपीएलमध्ये पुन्हा बाॅलिवूडची एन्ट्री! रणवीर-दीपिका घेणार नवीन संघ विकत

मुंबई | जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग ही बिरूदावली मिरवणारी आयपीएल स्पर्धा नुकतीच संपन्न झाली आहे. या स्पर्धेत चेन्नईनं 4 चौथ्यांदा विजेतेपदावर नाव कोरलं आहे. या स्पर्धेनं जागतिक क्रिकेटला अनेक प्रतिभावान खेळडू दिलं आहेत. येणाऱ्या आयपीएल 2022 मध्ये दोन नव्या संघांची घोषणा बीसीसीआय करणार आहे. अशातच आता बाॅलिवूडमधील कलाकार दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग हे आयपीएलचा संघ घेण्यास उत्सुक आहेत.

दोन नव्या संघांसाठी बीसीसीआयनं निविदा मागवल्या आहेत. देश आणि विदेशातून नवीन संघ खरेदीसाठी आवेदनपत्र दाखल होत आहेत. त्यात आता दीपिका आणि रणवीर यांनी सुद्धा आयपीएलचा संघ विकत घेण्यासाठी निवीदा भरल्याची माहिती समोर येत आहे. अनेक कलाकार, व्यवसायिक या नविन संघ विकत घेण्यासाठी इच्छुक आहेत.

रणवीर आणि दीपिका हे बाॅलिवूडमधील यशस्वी कलाकार आहेत. नविन संघासाठी बेस प्राईज 2000 कोटी रूपये ठेवण्यात आली आहे. दीपिका आणि रणवीर यांनी जर आयपीएलमध्ये संघ विकत घेतला तर आयपीएल संघ घेणारे ते प्रीती झिंटा, शाहरूख खान, जुही चावला यांच्यानंतर चौथे मोठे स्टार ठरणार आहेत.

दरम्यान, आयपीएलमधील या दोन संघाबाबत बीसीसीआय लवकरच घोषणा करणार आहे. हे दोन नवीन संघ कोणत्या शहरांचे असतील याबाबत अजून कसलीही माहिती समोर आलेली नाही. रणवीर आणि दीपिका यांच्या आयपीएलमधील समावेशानं क्रिकेट आणि बाॅलिवूडचं नातं आणखीन वृद्धींगत होणार आहे.

थोडक्यात बातम्या 

नवाब मलिक म्हणतात, “मला राजस्थानमधून धमकीचा फोन येतोय, समीर वानखेडेंना…”

किरीट सोमय्यांच्या आरोपांवर अजित पवारांनी सोडलं मौन, मांडली जरंडेश्वरची कुंडली

1 नोव्हेंबरपासून व्हॅट्सअॅप होणार बंद, ‘या’ अँड्राॅइड फोनवर व्हाॅट्सअ‌ॅप होणार बंद

काँग्रेसचं टेन्शन वाढलं; पंजाबच्या राजकीय मैदानात आता ‘हा’ पक्ष करणार एन्ट्री

‘…त्यामुळे यावेळेस भारताचा पराभव होईल’; हाय होल्टेज सामन्यापूर्वी बाबर आझमचं मोठं वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More