नागपूर महाराष्ट्र

एसटीचा प्रवास आता होणार अधिक वेगवान; घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

नागपूर | एसटीचा प्रवास आता अधिक वेगवान होणार आहे. कारण कुठल्याही हॉटेलच्या थांब्यावर बस 15 मिनिटांहून अधिक वेळ थांबल्यास संबंधित बस चालक-वाहकाची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

काही चालक-वाहक प्रवाशांना जेवणासह इतर सुविधांचा लाभ घेता यावा म्हणून जास्त वेळ बस थांबवून ठेवतात. ही बाब लक्षात घेऊन प्रत्येक विभाग नियंत्रकाला चालक-वाहकांना स्पष्ट सूचना देण्यास सांगण्यात आलं आहे.

एसटीच्या सर्व विभाग नियंत्रकांकडे यासंबंधीचे आदेश देण्यात आले आहेत. एसटी बसेससाठी लांबच्या प्रवासादरम्यान विविध थांबे निश्चित करण्यात आलेत.

मार्ग तपासणीपथक आणि पर्यवेक्षकांना वेळोवेळी पाहणी करून थांब्यावर 15 मिनिटांहून अधिक काळ बस थांबताना दिसल्यास संबंधित यंत्रणेला सूचना द्यायची आहे. त्यानंतर संबंधित बसच्या चालक-वाहकाची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे.

थोडक्यात बातम्या-

“चंद्रकांतदादांचे पक्षांतर्गत विरोधक म्हणजे देवेंद्र फडणवीसच”

धनगर आरक्षणावरुन जयंत पाटलांचा भाजप सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले…

भाजपच्या काळातील विषय समित्या आणि अभ्यासगट बालभारतीकडून बरखास्त!

नवीन कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता घेण्याची गरज- अजित पवार

मी रहाणेच्या कर्णधारपदावर बोलणार नाही, कारण…- सुनिल गावसकर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या